धाराशिव मध्ये अमृत वर्गांचे यशस्वी आयोजन

धाराशिव मध्ये अमृत वर्गांमुळे विद्यार्थ्यांना हसतखेळत शिक्षणाची गोडी लागली आहे.

 धाराशिव मध्ये अमृत वर्गांचे यशस्वी आयोजन  मुख्य फोटो
 धाराशिव मध्ये अमृत वर्गांचे यशस्वी आयोजन  अतिरिक्त फोटो

धाराशिव येथे लहान मुलांच्या अमृत वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद धाराशिव : लहान मुलांमध्ये सुसंस्कार, नैतिक मूल्ये आणि व्यक्तिमत्त्व विकास घडविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या अमृत वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वर्गात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अमृत वर्गाची सुरुवात प्रार्थनेने करण्यात आली. त्यानंतर मुलांना नैतिक मूल्ये, चांगले संस्कार, देशभक्तीपर गीते, प्रेरणादायी कथा, विविध खेळ तसेच व्यक्तिमत्त्व विकासाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. मुलांनी सर्व उपक्रमांमध्ये आनंदाने व उत्साहाने सहभाग नोंदविला. मुलांच्या पालकांनी अशा संस्कारवर्गांची आजच्या काळात नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले. आयोजकांनी भविष्यातही धाराशिवमध्ये अशा प्रकारचे अमृत वर्ग नियमितपणे आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला. या उपक्रमामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास, शिस्त, सामाजिक जाणीव आणि सुसंस्कार रुजण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/



Publisher: Kalyani saraf News publisher name | Date: 11-07-2026 News publication date | Time: 06:05 PM News publication time | Views: 25 Number of times this news has been viewed | District: Dharashiv Related district of the news
Publisher: Kalyani saraf News publisher name | Date: 11-07-2026 News publication date | Time: 06:05 PM News publication time | Views: 25 Number of times this news has been viewed | District: Dharashiv Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement