अहिल्यानगर मधील न्यु आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज येथील डॉ.किरण डी.अहिरराव( डिपार्टमेंट हेड-मानसशास्त्र विभाग) यांची भेट घेऊन अमृत मानसमित्र प्रशिक्षण संदर्भात माहिती देण्यात आली.
अहिल्यानगर :- अहिल्यानगर मधील न्यु आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज येथील डॉ.किरण डी.अहिरराव(डिपार्टमेंट हेड-मानसशास्त्र विभाग) यांची भेट घेऊन अमृत मानसमिञ प्रशिक्षण संदर्भात माहिती आज अमृत मित्र वैभव कुलकर्णी यांनी दिली.यावेळी डॉ. किरण डी. अहिरराव सर यांनी विशेष वेळ देऊन "अमृत मानसमित्र"या विषयी जाणून घेतले. तसेच लक्षित गटातील मागील वर्षीचे उत्तीर्ण विद्यार्थी असल्यास कळवणार.अमृत संस्थेला सहकार्य करण्याची सकारात्मक ता त्यांनी दाखवली.अमृत संस्थेच्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक करत समुपदेशकाचे महत्व आणि गरज लक्षात घेता हे प्रशिक्षण अतिशय उपयुक्त असल्याचे सांगितले. अमृत संस्थेचे अधिकृत पत्र त्यांना देण्यात आले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी,जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार इत्यादी जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/ अमृत जिल्हा कार्यालय संपर्क क्रमांक :- 9112228769 जिल्हा कार्यालय पत्ता : वरुण अपार्टमेंट, आकाशवाणी केंद्र समोर,प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - 414003
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment