अमृतच्या वैयक्तिक व्याज परतावा योजनेमुळे उद्योजकाला मिळाला आर्थिक दिलासा

'शुभम हँडीक्राफ्ट'चे सपानकुमार राठी यांना सहा महिन्यांचा व्याज परतावा

अमृतच्या वैयक्तिक व्याज परतावा योजनेमुळे उद्योजकाला मिळाला  आर्थिक दिलासा मुख्य फोटो
मुख्य फोटो

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना स्वयंरोजगार, उद्योजकता विकास, कौशल्य प्रशिक्षण तसेच विविध आर्थिक सहाय्याच्या योजनांद्वारे सक्षम करण्यासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या वैयक्तिक व्याज परतावा योजनेचा लाभ जालना येथील 'शुभम हँडीक्राफ्ट' उद्योगाचे संचालक श्री. सपानकुमार राठी यांना मिळाला आहे. या योजनेमुळे त्यांच्या उद्योगाला आर्थिक बळ मिळून व्यवसाय विस्ताराला चालना मिळाली आहे. व्यवसायासाठी आवश्यक भांडवल उभारण्याच्या उद्देशाने श्री. राठी यांनी अमृतच्या जालना जिल्हा कार्यालयातून योजनेची माहिती घेऊन ऑनलाइन अर्ज सादर केला. अर्जाची छाननी व पात्रता पडताळणीनंतर त्यांना लेटर ऑफ इंटेंट (एलओआय) प्रदान करण्यात आले. त्यानंतर आवश्यक बँक कागदपत्रांची पूर्तता करून त्यांचे कर्ज प्रकरण मंजूर झाले. कर्ज वितरणानंतर योजनेतील सर्व अटी व निकषांची पूर्तता झाल्यावर अमृत संस्थेमार्फत प्रत्येकी तीन महिन्यांच्या टप्प्यांमध्ये एकूण सहा महिन्यांचा व्याज परतावा थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला. या आर्थिक सहाय्यामुळे व्यवसायाला मोठा आधार मिळाल्याची भावना श्री. राठी यांनी व्यक्त केली. योजनेचा लाभ मिळाल्यानंतर श्री. सपानकुमार राठी यांनी अमृतच्या जालना जिल्हा कार्यालयात भेट देऊन अमृत संस्थेचे व जिल्हा व्यवस्थापक श्री. नितीन खेकाळे यांचे लेखी तसेच व्हिडिओ संदेशाद्वारे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. अमृतची वैयक्तिक व्याज परतावा योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल उद्योजकांसाठी अत्यंत उपयुक्त असून पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. अमृत संस्था स्वयंरोजगार, उद्योजकता विकास, कौशल्य प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्याच्या विविध योजनांद्वारे खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सक्षम करण्यासाठी सातत्याने कार्यरत असून अधिक माहितीसाठी इच्छुकांनी आपल्या जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अशाच योजनांच्या माहितीसाठी : अमृत जिल्हा कार्यालय, दूसरा मजला, प्रशासकीय इमारत, जिल्हा अधिकारी कार्यालय, जालना मो. ७३९१०६५४७४ / 9130283058


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/


Publisher: Nitin Khekale News publisher name | Date: 11-07-2026 News publication date | Time: 02:27 PM News publication time | Views: 79 Number of times this news has been viewed | District: Jalna Related district of the news
Publisher: Nitin Khekale News publisher name | Date: 11-07-2026 News publication date | Time: 02:27 PM News publication time | Views: 79 Number of times this news has been viewed | District: Jalna Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement