महिला उद्योजिकांसाठी अमृतची सुवर्णसंधी; अमृत उद्यम शक्ती योजना अंतर्गत फक्त १२ जागा उपलब्ध!

महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था – अमृत यांच्या 'अमृत उद्यम शक्ती योजना' अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील महिला उद्योजिकांसाठी मर्यादित फक्त १२ जागा उपलब्ध आहेत. तेव्हा त्वरित अमृत कार्यालय, गोंदिया येथे संपर्क साधावा.

महिला उद्योजिकांसाठी अमृतची सुवर्णसंधी; अमृत उद्यम शक्ती योजना अंतर्गत फक्त १२ जागा उपलब्ध! मुख्य फोटो
मुख्य फोटो

महिला उद्योजिकांसाठी सुवर्णसंधी! ‘अमृत उद्यम शक्ती योजना’ अंतर्गत फक्त १२ जागा उपलब्ध महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था – अमृत यांच्या "अमृत उद्यम शक्ती योजना" उपक्रमांतर्गत गोंदिया जिल्ह्यातील महिला उद्योजिकांसाठी विशेष संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संपूर्ण जिल्ह्यात फक्त १२ महिलांची मर्यादित निवड करण्यात येणार असल्याने इच्छुकांनी त्वरित नोंदणी करावी. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या महिला उद्योजिकांना अमृत पेठ ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर निःशुल्क नोंदणी करून त्यांच्या उत्पादनांना डिजिटल बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल. त्यामुळे स्थानिक उत्पादनांना जिल्हा, राज्य आणि देशभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळेल. याशिवाय, पात्र लाभार्थ्यांना व्यवसाय विस्तारासाठी आवश्यक मार्गदर्शन, उद्योजकता प्रशिक्षण, आयात-निर्यात (Import-Export) विषयक माहिती, व्यवसाय नियोजनासाठी सहाय्य तसेच अमृतच्या नियमानुसार व्यावसायिक कर्जावरील व्याज परतावा योजनेचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध होईल. घरगुती उद्योग, खाद्यप्रक्रिया, हस्तकला, शिवणकाम, बुटीक, ब्युटी पार्लर, किरकोळ व्यवसाय, ऑनलाइन विक्री किंवा इतर कोणताही उद्योग करणाऱ्या महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा. मर्यादित जागा – प्रथम नोंदणी करणाऱ्यांना प्राधान्य. अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी संपर्क: अमृत कार्यालय, गोंदिया (महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था) 7620442709, 9112228776


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/


Publisher: Kartik Tiwari News publisher name | Date: 11-07-2026 News publication date | Time: 02:18 PM News publication time | Views: 56 Number of times this news has been viewed | District: Gondia Related district of the news
Publisher: Kartik Tiwari News publisher name | Date: 11-07-2026 News publication date | Time: 02:18 PM News publication time | Views: 56 Number of times this news has been viewed | District: Gondia Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement