नोकरीपेक्षा मोठे समाधान… विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आशेचा किरण बना! 'मानसमित्र' प्रशिक्षणासाठी अर्ज करा

"नोकरीपेक्षा मोठे समाधान… विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आशेचा किरण बना! 'मानसमित्र' प्रशिक्षणासाठी अर्ज करा"

नोकरीपेक्षा मोठे समाधान… विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आशेचा किरण बना! 'मानसमित्र' प्रशिक्षणासाठी अर्ज करा मुख्य फोटो
मुख्य फोटो

"नोकरीपेक्षा मोठे समाधान… विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आशेचा किरण बना! 'मानसमित्र' प्रशिक्षणासाठी अर्ज करा". सिल्लोड, दि. १० जुलै : विद्यार्थ्यांमध्ये वाढत असलेला मानसिक ताण, चिंता, नैराश्य, व्यसनाधीनता तसेच आत्महत्येसारख्या गंभीर घटनांना प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या पुढाकारातून 'मानसमित्र' (शालेय समुपदेशक) हा पूर्णपणे मोफत प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या प्रशिक्षणासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. हा उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था (MIMH) यांच्या तांत्रिक सहकार्याने राबविण्यात येणार असून, अमृतच्या लक्षित गटातील पात्र उमेदवारांना या प्रशिक्षणाचा लाभ मिळणार आहे. गेल्या वर्षी एम.ए., एम.एस्सी मानसशास्त्र. किंवा एमएसडब्ल्यू पदवी उत्तीर्ण झालेले अमृत लक्षित गटातील विद्यार्थी या प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतात. इच्छुकांनी गुगल फॉर्मद्वारे आपली नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांच्या मानसिक समस्या ओळखणे, त्यांना योग्य समुपदेशन करणे, मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे, तणाव व्यवस्थापन, नैराश्य व व्यसनाधीनतेवर मार्गदर्शन, तसेच आत्महत्येच्या प्रवृत्ती रोखण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित केले जाणार आहे. प्रशिक्षणानंतर शाळांमध्ये प्रशिक्षित 'मानसमित्र' तयार होऊन विद्यार्थ्यांना वेळेवर मानसिक आधार आणि योग्य दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करता येणार आहे. याशिवाय विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यात सकारात्मक संवाद निर्माण होण्यास मदत होईल. शाळांमध्ये निरोगी, आनंदी आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार असून, मानसिक आरोग्य क्षेत्रात भविष्यात काम करण्याची इच्छाही असलेल्या युवक-युवतींसाठी ही एक महत्त्वाची संधी आहे. प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १२ जुलै २०२६ असून, पात्र उमेदवारांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता त्वरित नोंदणी करावी, असे आवाहन अमृतच्या करण्यात आले आहे. अर्ज करण्यासाठी

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSchMJJkWanukotcAGIYIKVlovT1N7MLRrBI76a-DNQNLahjnQ/viewform?usp=dialog⁠ अधिक माहितीसाठी संपर्क : ७३९१०६५४७५ / ९४०३२००६०६.

Publisher: योगेश रोडे News publisher name | Date: 10-07-2026 News publication date | Time: 05:51 PM News publication time | Views: 174 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: योगेश रोडे News publisher name | Date: 10-07-2026 News publication date | Time: 05:51 PM News publication time | Views: 174 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 2 Comments

S
Shantanus Vyas
14-07-2026 09:31 AM

Reading skill improve

S
Sudhir vyas
14-07-2026 05:29 AM

मला माझ्या मुला संदर्भात भेटायचे आहे

Write a Comment
0 / 50 words
Advertisement