ज्ञान, खेळ आणि संस्कारांचा संगम; निवासी अंधशाळेत अमृत वर्गाचे आयोजन

नांदेड (वसरणी) येथील निवासी अंधशाळा, वसरणी येथे अमृत परिवाराच्या वतीने प्रेरणादायी आणि आनंददायी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

ज्ञान, खेळ आणि संस्कारांचा संगम; निवासी अंधशाळेत अमृत वर्गाचे आयोजन  मुख्य फोटो
ज्ञान, खेळ आणि संस्कारांचा संगम; निवासी अंधशाळेत अमृत वर्गाचे आयोजन  अतिरिक्त फोटो

नांदेड (वसरणी): वसरणी येथील निवासी अंधशाळेत अमृत परिवाराच्या वतीने प्रेरणादायी आणि आनंददायी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक तसेच कर्मचारी यांची भेट घेऊन त्यांना अमृत उपक्रमाची सविस्तर माहिती देण्यात आली. समाजहितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत आणि अमृतच्या उद्दिष्टांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.


यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विशेष अमृत वर्ग घेण्यात आला. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्यात आत्मविश्वास, सकारात्मक विचार आणि आनंदी जीवनमूल्ये रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध मनोरंजक आणि सहभागात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले. खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि संपूर्ण परिसर आनंदाने भरून गेला.


कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले आणि शाळेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.


हा उपक्रम केवळ माहितीपर न राहता विद्यार्थ्यांच्या जीवनात आनंद, प्रेरणा आणि आपुलकीची भावना निर्माण करणारा ठरला. उपस्थित शिक्षक व कर्मचाऱ्यांनीही अमृत परिवाराच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करून भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. सामाजिक बांधिलकी जपत नुकतीच 'अमृत' टीमकडून दरीतील असनी येथील अंध शाळेला सदिच्छा भेट देण्यात आली. या भेटीदरम्यान शाळेतील दृष्टिहीन मुलांना खाऊचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यात आला. उपस्थित सदस्यांनी मुलांशी संवाद साधत त्यांच्याशी विविध विषयांवर गप्पा मारल्या आणि त्यांचे मनोबल वाढवले. अंध शाळेतील प्रशासनाने आणि शिक्षकांनी अमृत टीमच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले व आभार मानले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अमृत टीमच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Manisha Kunsavalikar News publisher name | Date: 10-07-2026 News publication date | Time: 12:25 PM News publication time | Views: 101 Number of times this news has been viewed | District: Nanded Related district of the news
Publisher: Manisha Kunsavalikar News publisher name | Date: 10-07-2026 News publication date | Time: 12:25 PM News publication time | Views: 101 Number of times this news has been viewed | District: Nanded Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement