शिरूर शहरामध्ये अमृतच्या विविध योजनांच्या जनजागृती कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिरूर शहर येथे अमृततर्फे घेण्यात आलेल्या EDP प्रशिक्षण व विविध योजनांच्या संदर्भात घेण्यात आलेल्या मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला

शिरूर शहरामध्ये अमृतच्या  विविध योजनांच्या जनजागृती कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मुख्य फोटो
शिरूर शहरामध्ये अमृतच्या  विविध योजनांच्या जनजागृती कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद अतिरिक्त फोटो

शिरूर शहरात अमृत संस्थेच्या विविध योजनांच्या जनजागृतीसाठी आयोजित बैठकीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या बैठकीमध्ये विभागीय व्यवस्थापक श्री. देवदत्त पंडित, जिल्हा व्यवस्थापक सिद्धेश केसकर, अमृत मित्र कमलाकर कुलकर्णी, शिरूर शहर शिवसेना नेते श्री. प्रमोद काका जोशी, महाराष्ट्र ब्राह्मण सभा प्रदेश महिला अध्यक्ष सौ. अनघाताई पाठकजी, महाराष्ट्र ब्राह्मण सभांचे श्री. चैतन्य वाघ, गुजराती ब्राह्मण संघाचे श्री. विकी उर्फ मुन्ना रावळजी, साईपद्मश्री श्री. राजू काका देशपांडे व इतर मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्यात श्री. सिद्धेश केसकर यांनी अमृतच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. यामध्ये शैक्षणिक योजना, EDP प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती, कौशल्य विकास, स्वयंरोजगार, व्यवसाय कर्ज, विविध प्रशिक्षण कार्यक्रम, अमृत वर्ग, अमृत संवाद सेतू तसेच इतर योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच श्री. देवदत्त पंडित यांनी उपस्थित नागरिकांच्या शंकांचे निरसन करून योजनांचा लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन व आवाहन केले. त्यांना अमृतच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. तसेच शिरूर येथे अमृतपेठ आयोजना संदर्भात चर्चा झाली. एकूणच प्रत्यक्ष जनसंपर्काच्या माध्यमातून शिरूरमध्ये अमृतच्या योजनांबाबत प्रभावी जनजागृती करण्यात आली असून नागरिकांकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद आगामी उपक्रमांसाठी प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.



अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/



Publisher: कमलाकर कुलकर्णी News publisher name | Date: 09-07-2026 News publication date | Time: 10:05 PM News publication time | Views: 292 Number of times this news has been viewed | District: Pune Related district of the news
Publisher: कमलाकर कुलकर्णी News publisher name | Date: 09-07-2026 News publication date | Time: 10:05 PM News publication time | Views: 292 Number of times this news has been viewed | District: Pune Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement