अहिल्यानगर मधील प्रकाश देशपांडे यांना अमृत संस्थे कडून मिळाला व्याज परतावा

अहिल्यानगर मधील संगमनेर येथील व्यावसायिक प्रकाश देशपांडे यांना अमृत संस्थे कडून व्याज परतावा मिळाला.

अहिल्यानगर मधील प्रकाश देशपांडे यांना अमृत संस्थे कडून मिळाला व्याज परतावा मुख्य फोटो
मुख्य फोटो

अहिल्यानगर मधील संगमनेर येथील व्यावसायिक प्रकाश देशपांडे यांना अमृत संस्थे कडून मिळाला व्याज परतावा..प्रकाश देशपांडे यांना व्यवसाय वाढीसाठी अमृत संस्थेची मिळाली साथ. लक्षित गटातील व्यावसायिक प्रकाश देशपांडे यांना अमृत संस्थेच्या व्याज परतावा योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजनेमुळे त्यांच्या व्यवसायाला आर्थिक बळ मिळाले असून व्यवसायाचा विस्तार करण्यास मोठी मदत झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. प्रकाश देशपांडे यांनी अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांची अमृत कार्यालय येथे भेट घेतली.वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल व सहकार्याबद्दल अमृत संस्थेचे आभार मानले. अमृत संस्थेची व्याज परतावा योजना ही लक्षित गटातील उद्योजकांना आर्थिक दिलासा देणारी महत्त्वाची योजना असून, या योजनेमुळे अनेक तरुणांना स्वयंरोजगार व नवीन व्यवसाय व व्यवसाय वृद्धीसाठी प्रोत्साहन मिळत आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी अशा योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहनही यावेळी जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी केले आहे.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी,जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार इत्यादी जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/ अमृत जिल्हा कार्यालय संपर्क क्रमांक :- 9112228769 जिल्हा कार्यालय पत्ता : वरुण अपार्टमेंट, आकाशवाणी केंद्र समोर,प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - 414003

Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 09-07-2026 News publication date | Time: 06:31 PM News publication time | Views: 165 Number of times this news has been viewed | District: Ahilyanagar Related district of the news
Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 09-07-2026 News publication date | Time: 06:31 PM News publication time | Views: 165 Number of times this news has been viewed | District: Ahilyanagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement