श्री गुजराती कन्या विद्यालयात अमृत योजनांची माहिती; शनिवारी 'अमृत वर्गाचे आयोजन

श्री गुजराती कन्या विद्यालयात अमृतच्या योजना आणि अमृत वर्ग उपक्रमाची माहिती देण्यात आली. या उपक्रमाला मुख्याध्यापिका कविता टापर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत शनिवारी शाळेत अमृतवर्ग कार्यक्रमासाठी निमंत्रण दिले.

श्री गुजराती कन्या विद्यालयात अमृत योजनांची माहिती; शनिवारी 'अमृत  वर्गाचे  आयोजन  मुख्य फोटो
श्री गुजराती कन्या विद्यालयात अमृत योजनांची माहिती; शनिवारी 'अमृत  वर्गाचे  आयोजन  अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर : गुजराती समाज विकास मंडळ संचलित श्री गुजराती कन्या विद्यालयात मुख्याध्यापिका कविता अतुल टापर मॅडम आणि गुजराती समाजाचे अध्यक्ष राजेश मेहता यांच्यासोबत अमृतच्या योजना आणि उपक्रमांबाबत बैठक झाली. यावेळी अमृतच्या माध्यमातून चालणाऱ्या विविध योजना, प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. विशेष करून 'अमृत वर्ग' म्हणजे नेमकं काय, त्यातून विद्यार्थ्यांना काय फायदा होतो, हे सविस्तर सांगण्यात आलं. अमृत वर्गामध्ये मुलांना फक्त पुस्तकांचं शिक्षण नाही, तर वेगवेगळे खेळ, नवीन गोष्टी शिकवणं, व्यक्तिमत्त्व विकास, शिस्त, नेतृत्वगुण आणि विविध उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्यावर भर दिला जातो. त्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांचा सर्वांगीण विकास होतो, अशी माहिती यावेळी देण्यात आली. ही संकल्पना मुख्याध्यापिका कविता टापर मॅडम यांना आवडली. त्यांनी आपल्या शाळेत शनिवारी 'अमृतवर्ग' घेण्यासाठी निमंत्रण दिलं. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन मिळणार आहे. अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 09-07-2026 News publication date | Time: 05:59 PM News publication time | Views: 52 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 09-07-2026 News publication date | Time: 05:59 PM News publication time | Views: 52 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement