फुलंब्री तालुक्यात अमृत संस्थेच्या योजनांबद्दल नागरिकांमध्ये निर्माण झाली उत्सुकता

गावोगावी फिरून लक्ष्यित गटातील घटकांना देण्यात आली माहिती; उभे राहणार नवे उद्योजक

फुलंब्री तालुक्यात अमृत संस्थेच्या योजनांबद्दल नागरिकांमध्ये निर्माण झाली उत्सुकता मुख्य फोटो
मुख्य फोटो

छत्रपती संभाजीनगर : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सकारात्मक प्रयत्न सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या फुलंब्री या ग्रामीण तालुक्यात विविध ठिकाणी अमृत संस्थेचे जिल्हा उपव्यवस्थापक योगेश रोडे यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या आणि नागरिक, पुरोहित व छोटे व्यावसायिक यांच्याशी थेट संवाद साधला.

या दौऱ्यामध्ये जातवा येथे नारायण दहीभाते यांची भेट घेऊन त्यांना अमृत संस्थेच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. या वेळी त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली असून, आवश्यक कागदपत्रांसह लवकरच अर्ज करणार असल्याचे सांगितले.
यानंतर येथील मंडप व्यवसायिक व पुरोहित राजू प्रल्हाद दीक्षित यांची भेट घेण्यात आली. त्यांना अमृत संस्थेच्या वैयक्तिक व्याज परतावा योजनेची माहिती देण्यात आली. कोणतेही शुल्क न घेता समाजातील घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या या योजनेबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अमृत संस्था व संस्थेच्या सर्व प्रमुखांचे मनःपूर्वक आभार मानले. 'ब्राह्मण समाजासाठीही अशा प्रकारची योजना उपलब्ध करून दिली जात आहे, ही बाब खरोखरच समाधानकारक आहे,' अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
बाबरा येथे सुमारे पाचशे वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक बालाजी मंदिर आहे. तेथे श्री बालाजी महाराजांचे दर्शन घेऊन अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील लाभार्थ्यांना त्यांच्या व्यवसायात यश लाभावे, अशी प्रार्थना करण्यात आली. मंदिरातील पुरोहित सुभाष देवा यांनादेखील अमृत संस्थेच्या योजनांची माहिती देण्यात आली. त्यांनी पुढील काळात पूजा साहित्य भंडार सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली.
या प्रवासात बाबरा येथील छोटे व्यावसायिक सौरभ झालानी, रमेश झालानी, गौरव झालानी, राहुल झालानी, विनोद झालानी, संजय सुखिया आदींच्या भेटी घेऊन त्यांना अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. संबंधित लाभार्थ्यांची आवश्यक कागदपत्रे लवकरात लवकर पूर्ण करून ऑनलाइन अर्ज सादर केला जाणार आहे.
या दौऱ्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये अमृत संस्थेच्या योजनांविषयी विश्वास व सकारात्मकता निर्माण झाली असून, स्वयंरोजगार व लघुउद्योगांना चालना देण्याच्या दिशेने हा प्रवास निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :
योगेश भास्करराव रोडे
छत्रपती संभाजीनगर जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत
संपर्क : 9403200606

Publisher: Yogesh Rode News publisher name | Date: 25-12-2025 News publication date | Time: 11:40 AM News publication time | Views: 122 Number of times this news has been viewed | District: chhatrapati_sambhajinagar Related district of the news
Publisher: Yogesh Rode News publisher name | Date: 25-12-2025 News publication date | Time: 11:40 AM News publication time | Views: 122 Number of times this news has been viewed | District: chhatrapati_sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words