लातूर: अमृत व MCED यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सूर्यमित्र प्रशिक्षण कार्यक्रमास अमृतचे राज्य व्यवस्थापक श्री. दीपक जोशी यांनी सदिच्छा भेट देऊन प्रशिक्षण केंद्रातील विविध सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रशिक्षणाची एकूण व्यवस्था, वेळापत्रक, प्रशिक्षणार्थ्यांची उपस्थिती, शिस्त तसेच प्रशिक्षणाच्या गुणवत्तेचा सविस्तर आढावा घेतला.
लातूर : अमृत व MCED यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सूर्यमित्र प्रशिक्षण कार्यक्रमास अमृतचे राज्य व्यवस्थापक श्री. दीपक जोशी यांनी सदिच्छा भेट देऊन प्रशिक्षण केंद्रातील विविध सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रशिक्षणाची एकूण व्यवस्था, वेळापत्रक, प्रशिक्षणार्थ्यांची उपस्थिती, शिस्त तसेच प्रशिक्षणाच्या गुणवत्तेचा सविस्तर आढावा घेतला.
प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी गेल्या दोन दिवसांतील प्रशिक्षणाचा अनुभव, प्रशिक्षणाबाबतची मते तसेच येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षणाची गुणवत्ता, उपलब्ध सुविधा आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांबाबत समाधान व्यक्त करत प्रशिक्षण नियोजनबद्ध व प्रभावीपणे सुरू असल्याचे सांगितले.
यावेळी श्री. दीपक जोशी यांनी प्रशिक्षण अधिक परिणामकारक करण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या. तांत्रिक ज्ञानासोबतच शिस्त, वेळेचे नियोजन, सुरक्षिततेचे नियम आणि प्रत्यक्ष कामातील कौशल्य विकसित करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. सौरऊर्जा क्षेत्रासाठी कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्यात सूर्यमित्र प्रशिक्षणाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.
या भेटीप्रसंगी श्री. अमित सामंत (विभागीय व्यवस्थापक), श्री. ओंकार शेटे (विभागीय उपव्यवस्थापक), श्री. चिन्मय कुलकर्णी (धाराशिव जिल्हा व्यवस्थापक), श्री. चिंतेश जोशी (लातूर जिल्हा उपव्यवस्थापक), श्री. दीपक गायकवाड (MCED प्रकल्प अधिकारी), श्री. अमोल दिवेकर तसेच प्रशिक्षक श्री. सुशील गायकवाड उपस्थित होते.
भेटीदरम्यान प्रशिक्षण केंद्रातील सुविधा, प्रशिक्षणाची प्रभावी अंमलबजावणी आणि प्रशिक्षणार्थ्यांचा उत्साही सहभाग याबाबत समाधान व्यक्त करण्यात आले. तसेच प्रशिक्षण यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशिक्षक व संबंधित अधिकाऱ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
शुभम मुळजकर
जिल्हा व्यवस्थापक
अमृत कार्यालय,लातूर
संपर्क क्रमांक- 7391065470
पत्ता -पहिला मजला ,पित्रछया बिल्डिंग, मयुरेश्वर अपार्टमेंट ,सिग्नल कॅम्प, विद्यानगर ,लातूर तालुका, जिल्हा लातूर-413512
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment