सांगलीत EDP उद्योजकता विकास प्रशिक्षणास प्रारंभ

या प्रशिक्षणामध्ये व्यवसाय निवड, बाजारपेठेचा अभ्यास, प्रकल्प अहवाल तयार करणे, शासकीय योजना, बँक कर्ज प्रक्रिया, उद्योग नोंदणी, डिजिटल मार्केटिंग, ब्रँडिंग, व व्यवसाय व्यवस्थापन अशा विविध विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

सांगलीत EDP उद्योजकता विकास प्रशिक्षणास प्रारंभ मुख्य फोटो
मुख्य फोटो

सांगली : स्थानिक पातळीवर स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी आणि नवउद्योजक घडविण्याच्या उद्देशाने सांगली येथे EDP (Entrepreneurship Development Programme) उद्योजकता विकास प्रशिक्षणास प्रारंभ झाला आहे. हा उपक्रम महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. अमृतच्या विभागीय व्यवस्थापक देवदत्त पंडित यांच्या हस्ते या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी अमृतचे जिल्हा समन्वयक मनोज मिरासदार, शैलेंद्र जहागिरदार, सौ गौरी कुलकर्णी उपस्थित होते. या प्रशिक्षणामध्ये व्यवसाय निवड, बाजारपेठेचा अभ्यास, प्रकल्प अहवाल तयार करणे, शासकीय योजना, बँक कर्ज प्रक्रिया, उद्योग नोंदणी, डिजिटल मार्केटिंग, ब्रँडिंग, व व्यवसाय व्यवस्थापन अशा विविध विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच सहभागी युवक-युवतींना उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली व्यावहारिक माहितीही दिली जाणार आहे. स्वयंरोजगाराच्या संधी वाढवून जिल्ह्यात सक्षम उद्योजक तयार करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा असून पात्र युवक-युवतींनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. उद्घाटनप्रसंगी मान्यवरांनी उद्योग क्षेत्रात यश मिळविण्यासाठी चिकाटी, सातत्य, नावीन्य आणि आत्मविश्वास आवश्यक असल्याचे सांगितले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार असून सहभागी युवक-युवतींनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले. अधिक माहितीसाठी संपर्क : ९११२२२८७६६ पत्ता : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी, अप्पर तहसीलदार कार्यालया समोर, राजवाडा, सांगली. अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: शैलेन्द्र जहागिरदार News publisher name | Date: 08-07-2026 News publication date | Time: 04:52 PM News publication time | Views: 98 Number of times this news has been viewed | District: Sangli Related district of the news
Publisher: शैलेन्द्र जहागिरदार News publisher name | Date: 08-07-2026 News publication date | Time: 04:52 PM News publication time | Views: 98 Number of times this news has been viewed | District: Sangli Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement