सोलापूर: 'अमृत' 'संवाद सेतू' उपक्रम उत्साहात; जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट!

सोलापूर: 'अमृत' 'संवाद सेतू' उपक्रम उत्साहात; जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना अमृतच्या योजनांची महिती दिली.

सोलापूर: 'अमृत' 'संवाद सेतू' उपक्रम उत्साहात; जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट! मुख्य फोटो
सोलापूर: 'अमृत' 'संवाद सेतू' उपक्रम उत्साहात; जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट! अतिरिक्त फोटो

सोलापूर, दिनांक ८ जून २०२६: महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेच्या वतीने सोलापूर जिल्ह्यामध्ये आज 'संवाद सेतू' या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत 'अमृत'च्या प्रतिनिधींनी आणि प्रशिक्षणार्थींनी आज सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सर्व उपस्थितांना अत्यंत सविस्तर आणि उपयुक्त माहिती देण्यात आली. आज पार पडलेल्या या 'संवाद सेतू' उपक्रमामध्ये सोलापूर जिल्ह्यातील जवळजवळ १५ ते २० जण उपस्थित होते. या संवाद सत्रादरम्यान उपस्थित युवकांनी आणि नागरिकांनी आपल्या मनातील विविध प्रशासकीय योजना, रोजगार आणि प्रशिक्षणाबाबतच्या शंका मांडल्या. तिथे उपस्थित असलेल्या माननीय तहसीलदार मॅडम यांनी सर्वांच्या शंकांचे अत्यंत अभ्यासपूर्ण आणि सोप्या भाषेत निरसन केले. उपस्थित प्रत्येकाच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देऊन त्यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. प्रशासकीय कामकाज समजून घेणे आणि शासकीय योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचवणे या उद्देशाने सुरू असलेला हा 'संवाद सेतू' उपक्रम सोलापूर जिल्ह्यात अत्यंत प्रभावी ठरला आहे.. या उपक्रमामुळे तरुणांना प्रशासनाशी थेट संवाद साधण्याची एक सुवर्णसंधी मिळाली, ज्याबद्दल सर्व उपस्थितांनी 'अमृत' प्रबोधिनी आणि जिल्हा प्रशासनाचे आभार मानले आहेत. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाचा अधिकृत पत्ता खालीलप्रमाणे आहे:दुसरा मजला, महसूल भवन,जिल्हाधिकारी कार्यालय, सात रस्ता,सोलापूर - ४१३००३


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Shreyas Kulkarni,Birudev Waghmode, Arya kulkarni News publisher name | Date: 08-07-2026 News publication date | Time: 03:15 PM News publication time | Views: 138 Number of times this news has been viewed | District: Solapur Related district of the news
Publisher: Shreyas Kulkarni,Birudev Waghmode, Arya kulkarni News publisher name | Date: 08-07-2026 News publication date | Time: 03:15 PM News publication time | Views: 138 Number of times this news has been viewed | District: Solapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement