छत्रपती संभाजीनगर येथील श्री सरस्वती सुपर एंजल किड्स स्कूलमध्ये अमृत वर्गाचे आयोजन

आज अमृत सखी मंजु कुलकर्णी यांनी सरस्वती सुपर एंजल किड्स स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती श्रद्धा देशमुख यांची घेण्यात आली. यावेळी त्यांना अमृत योजना, अमृत वर्ग आणि अमृत मानसमित्र या उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर येथील श्री सरस्वती सुपर एंजल किड्स स्कूलमध्ये  अमृत वर्गाचे आयोजन  मुख्य फोटो
मुख्य फोटो

आज अमृत सखी मंजु कुलकर्णी यांनी श्री सरस्वती सुपर एंजल किड्स स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती श्रद्धा देशमुख यांची भेट घेऊन त्यांच्याशी अमृत परिवाराच्या विविध उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी अमृत योजना, अमृत वर्ग आणि अमृत मानसमित्र या उपक्रमांची उद्दिष्टे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासातील त्यांचे महत्त्व तसेच शाळेमध्ये हे उपक्रम प्रभावीपणे कसे राबवता येतील याविषयी माहिती देण्यात आली.


अमृत वर्गांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार, शिस्त, आत्मविश्वास, सकारात्मक विचार, सर्जनशीलता, मानसिक स्वास्थ्य आणि सामाजिक जाणीव विकसित करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. तसेच अमृत मानसमित्र उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भावनिक आधार, समुपदेशन आणि आनंदी, तणावमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.


उपक्रमांची सविस्तर माहिती जाणून घेतल्यानंतर मुख्याध्यापिका श्रीमती श्रद्धा देशमुख यांनी या उपक्रमांचे स्वागत करत याच आठवड्यापासून शाळेच्या पूर्वप्राथमिक व प्राथमिक विभागासाठी दोन अमृतवर्ग सुरू करण्यास सहमती दर्शविली. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी हे उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आगामी काळात शाळेत अमृतचे विविध उपक्रम नियमितपणे राबविण्यासाठी सकारात्मक सहकार्य करण्याची तयारीही त्यांनी दर्शविली.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/


Publisher: Manju kulkarni News publisher name | Date: 07-07-2026 News publication date | Time: 06:26 PM News publication time | Views: 35 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Manju kulkarni News publisher name | Date: 07-07-2026 News publication date | Time: 06:26 PM News publication time | Views: 35 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement