अमृत सखी मंजु कुलकर्णी यांनी टायनी स्टेप्स इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. कविता जठार यांची भेट घेऊन महिलांची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी अमृत योजना तसेच अमृत वर्ग, अमृत कुटुंब संवाद, युवा शासन संवाद आणि अमृत पेठ (ऑफलाइन व ऑनलाइन) या उपक्रमांची माहिती देण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर येथील टायनी स्टेप्स इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. कविता जठार यांची आज भेट घेण्यात आली. यावेळी शाळेमध्ये महिलांची बैठक आयोजित करून अमृत सखी मंजु कुलकर्णी यांनी अमृत योजना तसेच विविध समाजोपयोगी उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.
बैठकीदरम्यान अमृत वर्ग, अमृत कुटुंब संवाद, युवा शासन संवाद आणि अमृत पेठ (ऑफलाइन व ऑनलाइन) या उपक्रमांची उद्दिष्टे, लाभ व सहभागाची प्रक्रिया उपस्थित महिलांना समजावून सांगण्यात आली. उपस्थितांनी या उपक्रमांविषयी उत्सुकता व्यक्त करत सकारात्मक प्रतिसाद दिला.
यावेळी मुख्याध्यापिका सौ. कविता जठार यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील आठवड्यापासून अमृत वर्ग सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, व्यक्तिमत्त्व विकास, संवादकौशल्य आणि सामाजिक जाणीव विकसित करण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment