अमृत वर्धा जिल्हा कार्यालयास माजी नगराध्यक्ष शेखरजी शेंडे यांची सदिच्छा भेट

अमृत वर्धा जिल्हा कार्यालयास माजी नगराध्यक्ष शेखरजी शेंडे यांची सदिच्छा भेट दिली.अमृतच्या विविध योजनांची माहिती घेतली.

अमृत वर्धा जिल्हा कार्यालयास माजी नगराध्यक्ष शेखरजी शेंडे यांची सदिच्छा भेट मुख्य फोटो
मुख्य फोटो

अमृत वर्धा जिल्हा कार्यालय येथे वर्धा शहराचे माजी नगराध्यक्ष शेखरजी शेंडे यांनी सदिच्छा भेट दिली.

यावेळी त्यांनी अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती जाणून घेतली. विशेषतः वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, ड्रोन पायलट प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा अर्थसहाय्य योजना तसेच IGTR संस्थेमार्फत उपलब्ध कौशल्य विकास प्रशिक्षण याविषयी त्यांनी माहिती घेतली.

अमृत संस्थेच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले व या योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र नागरिकांपर्यंत पोहोचावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. भेटीच्या शेवटी अमृत वर्धा जिल्हा कार्यालयातर्फे त्यांना अमृत दिनदर्शिका तसेच संस्थेच्या योजनांची माहिती देणारे माहिती स्टिकर भेटस्वरूप देण्यात आले.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: Rushikesh Kharate News publisher name | Date: 07-07-2026 News publication date | Time: 05:31 PM News publication time | Views: 49 Number of times this news has been viewed | District: Wardha Related district of the news
Publisher: Rushikesh Kharate News publisher name | Date: 07-07-2026 News publication date | Time: 05:31 PM News publication time | Views: 49 Number of times this news has been viewed | District: Wardha Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement