अमृत कुटुंब संवादातून कौटुंबिक ऐक्याचा संदेश

अमृत संस्थेच्या वतीने श्री. सुभाषचंद्र शर्मा यांच्या निवासस्थानी अमृत कुटुंब संवाद उपक्रम उत्साहात पार पडला.

अमृत कुटुंब संवादातून कौटुंबिक ऐक्याचा संदेश मुख्य फोटो
अमृत कुटुंब संवादातून कौटुंबिक ऐक्याचा संदेश अतिरिक्त फोटो

अमृत संस्थेच्या वतीने श्री. सुभाषचंद्र शर्मा यांच्या निवासस्थानी अमृत कुटुंब संवाद उपक्रम उत्साहात पार पडला. यावेळी अमृत संस्थेचे व्यवस्थापक अनिरुद्ध काटे व अनंत जोगदंड यांनी कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधत अमृत संस्थेच्या विविध योजना, उपक्रम तसेच सुदृढ, संस्कारक्षम आणि आनंदी कुटुंबव्यवस्था घडविण्याचे महत्त्व पटवून दिले.

यावेळी कुटुंबातील सदस्यांशी मुक्त संवाद साधून परस्पर विश्वास, संवाद आणि सहकार्य यामुळे कुटुंब अधिक सक्षम बनते, असा संदेश देण्यात आला. तसेच अमृत संस्थेच्या सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले. तसेच सुभाषचंद्र शर्मा यांचा मुलगा पवनकुमार शर्मा हे अमृत चे ई. डी. पी प्रशिक्षणाचे लाभार्थी आहेत.

उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत करून अशा कुटुंब संवाद कार्यक्रमांमुळे नातेसंबंध अधिक दृढ होण्यास मदत होत असल्याची भावना व्यक्त केली. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

विश्वास व जिव्हाळा ही कुटुंबाच्या बळकटीची मुख्य आधारस्तंभ असल्याचे वक्त्यांनी सांगितले. कुटुंबातील प्रत्येक सदस्याने एकमेकांना वेळ देऊन सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचे आवाहन करण्यात आले.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Anirudha Kate News publisher name | Date: 07-07-2026 News publication date | Time: 04:54 PM News publication time | Views: 64 Number of times this news has been viewed | District: Parbhani Related district of the news
Publisher: Anirudha Kate News publisher name | Date: 07-07-2026 News publication date | Time: 04:54 PM News publication time | Views: 64 Number of times this news has been viewed | District: Parbhani Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement