महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) तर्फे लघुउद्योजक उद्योजकता विकास (EDP) या पूर्णतः मोफत प्रशिक्षणासाठी ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत.
स्वतःच्या व्यवसायाचे स्वप्न साकार करण्याची सुवर्णसंधी! "नोकरी शोधणारे नाही, तर नोकरी देणारे बना!" महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) तर्फे लघुउद्योजक उद्योजकता विकास (EDP) या पूर्णतः मोफत प्रशिक्षणासाठी ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत. तुमच्याकडे व्यवसायाची कल्पना असेल किंवा सुरू असलेला व्यवसाय अधिक मोठा करण्याची इच्छा असेल, तर ही संधी तुमच्यासाठीच आहे. या प्रशिक्षणातून व्यवसाय नियोजन, आर्थिक व्यवस्थापन, शासकीय योजनांचे मार्गदर्शन आणि यशस्वी उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्ये मिळणार आहेत. आजच www.mahaamrut.org वर ऑनलाइन अर्ज करा आणि आत्मनिर्भरतेकडे पहिले पाऊल टाका. ऑनलाइन अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे : - आधार कार्ड,पॅन कार्ड,वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (₹8 लाखांपर्यंत),अधिवास (Domicile) प्रमाणपत्र,शाळा सोडल्याचा दाखला (TC) जात नमूद असलेली, कमीत कमी 8 वी पास गुणपत्रिका, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो,स्वघोषणापत्र (Self Declaration). अधिक माहितीसाठी: अमृत वर्धा जिल्हा कार्यालय, प्रशासकीय भवन, तळमजला, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, सिव्हिल लाईन, वर्धा. संपर्क: 9112227632 "आजचा अर्ज... उद्याच्या यशस्वी उद्योजकाची सुरुवात!" अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment