अमृत सूर्यमित्र प्रशिक्षणार्थ्यांना एमसीईडी विभागीय अधिकारी श्री. सुदाम थोटे यांचे लाभले मार्गदर्शन .

अमृत संस्थेच्या वतीने सुरू असलेल्या अमृत सूर्यमित्र प्रशिक्षण कार्यक्रमास महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) चे विभागीय अधिकारी श्री. सुदाम थोटे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांशी मुक्त संवाद साधत सौरऊर्जा क्षेत्रातील करिअरच्या वाढत्या संधी, आधुनिक तंत्रज्ञान आणि स्वयंरोजगाराच्या विविध पर्यायांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

अमृत सूर्यमित्र प्रशिक्षणार्थ्यांना एमसीईडी विभागीय अधिकारी श्री. सुदाम थोटे यांचे लाभले मार्गदर्शन . मुख्य फोटो
अमृत सूर्यमित्र प्रशिक्षणार्थ्यांना एमसीईडी विभागीय अधिकारी श्री. सुदाम थोटे यांचे लाभले मार्गदर्शन . अतिरिक्त फोटो

अमृत संस्थेच्या वतीने सुरू असलेल्या 'अमृत सूर्यमित्र' प्रशिक्षण कार्यक्रमास महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) चे विभागीय अधिकारी श्री. सुदाम थोटे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांशी मुक्त संवाद साधत सौरऊर्जा क्षेत्रातील करिअरच्या वाढत्या संधी, आधुनिक तंत्रज्ञान आणि स्वयंरोजगाराच्या विविध पर्यायांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.


श्री. थोटे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना केवळ प्रशिक्षण पूर्ण करण्यापुरते मर्यादित न राहता, प्रत्यक्ष कामाचा अनुभव, दर्जेदार सेवा आणि सातत्यपूर्ण कौशल्यवृद्धी यावर भर देण्याचे आवाहन केले. सौरऊर्जा क्षेत्र हे भविष्यातील महत्त्वाचे क्षेत्र असून, प्रशिक्षित युवकांसाठी रोजगार आणि उद्योजकतेच्या अनेक संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.


यावेळी प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या विविध शंकांचे निरसन करून घेतले. संवादात्मक वातावरणात झालेल्या या भेटीमुळे प्रशिक्षणार्थ्यांना नवी प्रेरणा मिळाली. मान्यवरांच्या मार्गदर्शनामुळे प्रशिक्षण अधिक प्रभावी ठरत असून, कौशल्याधारित रोजगारनिर्मितीसाठी अमृत संस्था सतत प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शुभम मुळजकर जिल्हा व्यवस्थापक अमृत कार्यालय,लातूर संपर्क क्रमांक- 7391065470 पत्ता -पहिला मजला ,पित्रछया बिल्डिंग, मयुरेश्वर अपार्टमेंट ,सिग्नल कॅम्प, विद्यानगर ,लातूर तालुका, जिल्हा लातूर-413512


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: कमलाक्षी कुलकर्णी News publisher name | Date: 07-07-2026 News publication date | Time: 12:26 PM News publication time | Views: 69 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news
Publisher: कमलाक्षी कुलकर्णी News publisher name | Date: 07-07-2026 News publication date | Time: 12:26 PM News publication time | Views: 69 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement