गोंदिया जिल्ह्यात अमृत वर्गाचे आयोजन

महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या माध्यमातून गोंदिया जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या अमृत वर्गांद्वारे तरुण व किशोरवयीन विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभावना, नैतिक मूल्ये, नेतृत्वगुण आणि सामाजिक उत्तरदायित्व विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.

गोंदिया जिल्ह्यात अमृत वर्गाचे आयोजन  मुख्य फोटो
गोंदिया जिल्ह्यात अमृत वर्गाचे आयोजन  अतिरिक्त फोटो

गोंदिया : महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने गोंदिया जिल्ह्यात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अमृत वर्ग राबविण्यात येत आहेत. या उपक्रमाचा मुख्य उद्देश तरुण व किशोरवयीन विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभावना, नैतिक मूल्ये, सामाजिक उत्तरदायित्व, नेतृत्वगुण आणि व्यक्तिमत्त्व विकास घडविणे हा आहे. अमृत वर्गामध्ये 'पंच परिवर्तन' या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून विद्यार्थ्यांमध्ये स्वदेशी व आत्मनिर्भरतेची भावना, सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, कौटुंबिक व सामाजिक जबाबदारी तसेच 'राष्ट्र प्रथम' हा विचार दृढ करण्यासाठी विविध उपक्रम, मार्गदर्शन सत्रे आणि प्रात्यक्षिके आयोजित करण्यात येणार आहेत. यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, सेवाभाव, संविधानाबद्दल आदर, सामाजिक सहभाग, नेतृत्व कौशल्य, सकारात्मक विचारसरणी आणि राष्ट्रनिर्माणात सक्रिय योगदान देण्याची प्रेरणा निर्माण केली जाणार आहे. संस्कारक्षम, जबाबदार आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारी युवा पिढी घडविण्याच्या उद्देशाने गोंदिया जिल्ह्यातील अधिकाधिक शाळा व महाविद्यालयांमध्ये अमृत वर्ग राबविण्याचा संकल्प करण्यात आला असून, या माध्यमातून विकसित भारताच्या निर्मितीसाठी सक्षम युवक घडविण्याचे कार्य करण्यात येणार आहे.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/


Publisher: Kartik Tiwari News publisher name | Date: 06-07-2026 News publication date | Time: 05:41 PM News publication time | Views: 182 Number of times this news has been viewed | District: Gondia Related district of the news
Publisher: Kartik Tiwari News publisher name | Date: 06-07-2026 News publication date | Time: 05:41 PM News publication time | Views: 182 Number of times this news has been viewed | District: Gondia Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement