लातूर, अमृत (AMRUT) आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘अमृत सूर्यमित्र’ प्रशिक्षण कार्यक्रमास आज लातूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला.
लातूर, अमृत (AMRUT) आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘अमृत सूर्यमित्र’ प्रशिक्षण कार्यक्रमास आज लातूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. युवक-युवतींना सौर ऊर्जा क्षेत्रातील आधुनिक तांत्रिक कौशल्ये आत्मसात करून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी अमृत विभागीय व्यवस्थापक श्री. अमित सामंत, MCED प्रकल्प प्रमुख श्री. दीपक गायकवाड, धाराशिव जिल्हा व्यवस्थापक श्री. चिन्मय कुलकर्णी, उपव्यवस्थापक श्री. चिंतेश जोशी ,अमृत सखी कमलाक्षी कुलकर्णी तसेच प्रशिक्षक स्नेहा फुलसे मॅडम ,सुशील गायकवाड सर व अमोल दिवेकर उपस्थित होते . यावेळी मान्यवरांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना सौर ऊर्जा क्षेत्रातील वाढत्या रोजगाराच्या संधींचा लाभ घेण्यासाठी कौशल्याधारित प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. प्रशिक्षणादरम्यान सोलर पीव्ही प्रणालीची स्थापना, देखभाल, सुरक्षितता, दुरुस्ती, उद्योजकता विकास तसेच सौर ऊर्जा क्षेत्रातील व्यवसायाच्या संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रशिक्षणामुळे युवकांना रोजगारक्षम कौशल्ये प्राप्त होण्यास मदत होणार असून सौर ऊर्जा क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठीही आवश्यक मार्गदर्शन मिळणार आहे. प्रशिक्षणार्थ्यांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. अमृत व MCED यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणारा हा प्रशिक्षण कार्यक्रम लातूर जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment