ब्राह्मण समाजाला उद्योग-व्यवसायात सक्षम करण्याच्या दृष्टीने देण्यात आली माहिती
नाशिक : ब्राह्मण महासंघ (नवीन नाशिक सिडको विभाग) आणि नाशिकमधील आरंभ सामाजिक सेवाभावी संस्था यांच्या वतीने एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ब्राह्मण समाज उद्योग-व्यवसायामध्ये सक्षम व्हावा, या अनुषंगाने सिडकोमधील सावतानगर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात हा कार्यक्रम झाला. ब्राह्मण समाजासाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती अमृतमित्र मयूर हातवळणे यांनी दिली. त्यात, खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांसाठी कार्यरत असलेल्याअमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या योजनांची संपूर्ण माहिती देऊन त्यांनी मार्गदर्शन केले. अमृत संस्थेतर्फे राबवल्या जाणाऱ्या बेकरी प्रशिक्षण योजना, अमृत आयात-निर्यात योजना, अमृत सूर्यमित्र प्रशिक्षण योजना, वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजना, तांत्रिक रोजगारक्षम प्रशिक्षण योजना (IGTR),अमृत –Bhau Incubation योजना या योजनांबद्दलच्या माहितीची खासकरून विचारणा झाली.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment