जालना येथे 'अमृत' तर्फे विशेष उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने जालना जिल्ह्यातील लक्षित गटातील युवक-युवतींना स्वयंरोजगारासाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने विशेष उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम (Entrepreneurship Development Programme- EDP) आयोजित करण्यात येत आहे.

जालना येथे 'अमृत' तर्फे विशेष उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम मुख्य फोटो
मुख्य फोटो

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने जालना जिल्ह्यातील लक्षित गटातील युवक-युवतींना स्वयंरोजगारासाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने विशेष उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम (Entrepreneurship Development Programme - EDP) आयोजित करण्यात येत आहे. उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान, कौशल्य आणि मार्गदर्शन या प्रशिक्षणाद्वारे सहभागी उमेदवारांना उपलब्ध करून दिले जाणार आहे.

या प्रशिक्षणामध्ये उद्योग व्यवसायाची योग्य निवड, बाजारपेठेचा अभ्यास, प्रकल्प अहवाल (Project Report) तयार करणे, बँक कर्जासाठी प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया, MSME नोंदणी, विविध शासकीय अनुदान व कर्ज योजना, डिजिटल मार्केटिंग, ब्रँडिंग, पॅकेजिंग, GST, व्यवसायासाठी आवश्यक परवाने तसेच आर्थिक नियोजन आदी विषयांवर अनुभवी तज्ज्ञांकडून सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम 'अमृत' संस्थेच्या लक्षित गटातील पात्र युवक-युवती, नवउद्योजक, महिला उद्योजिका तसेच ग्रामीण व शहरी भागातील स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेल्या इच्छुकांसाठी विशेष उपयुक्त ठरणार आहे.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/ अधिक माहितीसाठी : अमृत जिल्हा कार्यालय दुसरा मजला, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना. मो. : ७३९१०६५४७४

Publisher: Nitin Khekale News publisher name | Date: 06-07-2026 News publication date | Time: 04:14 PM News publication time | Views: 75 Number of times this news has been viewed | District: Jalna Related district of the news
Publisher: Nitin Khekale News publisher name | Date: 06-07-2026 News publication date | Time: 04:14 PM News publication time | Views: 75 Number of times this news has been viewed | District: Jalna Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement