नोंदणीनंतर अमृत संस्थेकडून मिळवा मोफत व्यावसायिक प्रशिक्षण...
कोल्हापूर : अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेकडून कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांची माहिती संकलित करण्यासाठी गुगल फॉर्म तयार करण्यात आला आहे. इच्छुक उमेदवारांनी त्यावर माहिती भरायची आहे. प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांची आवश्यक माहिती त्यामुळे एकाच ठिकाणी संकलित होणार आहे. उमेदवार कोणत्या विषयाचे किंवा कौशल्याचे प्रशिक्षण घेऊ इच्छितो, याची स्पष्ट माहिती या फॉर्मच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे प्रशिक्षण कार्यक्रमांचे योग्य नियोजन, विषयांची निवड, तसेच उमेदवारांच्या संख्येनुसार अभ्यासक्रम राबविणे अधिक सोपे होणार आहे, असे अमृत संस्थेचे कोल्हापूर जिल्हा व्यवस्थापक प्रशांत जोशी यांनी सांगितले.
तसेच जिथे उमेदवार असतील तिथेच प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेऊन त्यांच्या सोयीसाठी विशेष प्रयत्न करणे शक्य होणार आहे. या फॉर्ममधून प्राप्त होणारी सर्व माहिती थेट एक्सेल शीटमध्ये साठवली जाणार असल्याने इच्छुकांशी थेट संपर्क साधून, त्यांना त्या संदर्भातील प्रशिक्षणाची योग्य ती माहिती दिली जाईल. त्यानंतर त्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून घेण्यात येईल. उद्योजक झाल्यानंतर त्यांना सर्व शासकीय योजनांची माहिती देऊन जास्तीत जास्त लाभ मिळवून देता येईल. या उपक्रमामुळे कौशल्य विकास योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी, पारदर्शक आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने होणार आहे.
त्यामुळे नवउद्योजकांनी, उद्योग उभारू इच्छिणाऱ्यांनी नोंदणी करा आणि तुमचे उद्योजक होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यात अमृत संस्था तुम्हाला पूर्ण साथ देईल.
Link : https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdxmWf8da0_9HsCUFdh7G6Ekdzxm8atAUAgXbfqH80wkNmv4A/viewform?usp=dialog
(लिंकवर क्लिक होत नसल्यास ही लिंक कॉपी करून ब्राउझरमध्ये पेस्ट करावी.)
अमृत संस्थेच्या योजनांच्या अधिक माहितीसाठी संपर्क :
प्रशांत जोशी
जिल्हा व्यवस्थापक, अमृत, कोल्हापूर
9112228764
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment