चंद्रपूर जिल्ह्यात 15 जुलैपासून आयात-निर्यात प्रशिक्षण; उद्योजकांसाठी सुवर्णसंधी

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने दि. 15 जुलै 2026 पासून चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे आयात-निर्यात (Import-Export) विषयावरील विशेष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात  15 जुलैपासून आयात-निर्यात प्रशिक्षण; उद्योजकांसाठी सुवर्णसंधी मुख्य फोटो
मुख्य फोटो

या प्रशिक्षणात स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या उत्पादनांना मोठी बाजारपेठ कशी मिळवायची, आयात-निर्यात व्यवसायाची सुरुवात कशी करायची, आवश्यक कागदपत्रे, IEC नोंदणी, ग्राहकांशी संपर्क, शिपिंग, कस्टम्स प्रक्रिया तसेच ऑनलाइन माध्यमातून व्यवसायाच्या संधी कशा शोधायच्या याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील कृषी उत्पादने, वनउत्पादने, हस्तकला तसेच लघुउद्योगांमधून तयार होणाऱ्या वस्तूंना देशांतर्गत व परदेशातील बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आवश्यक माहिती या प्रशिक्षणाद्वारे दिली जाणार आहे. त्यामुळे स्थानिक उत्पादक आणि उद्योजकांना आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी हे प्रशिक्षण निश्चितच उपयुक्त ठरेल.

प्रवेशासाठी मर्यादित जागा उपलब्ध असल्याने इच्छुकांनी लवकरात लवकर नोंदणी करून या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क - 9112228774, 9890746453 अमृत जिल्हा कार्यालय पत्ता : गुरुद्वारा रोड, कृष्णा टॉवरजवळ, तुकूम, चंद्रपूर - 442402 ई-मेल : amrut.chandrapur.dm@mail.com

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, वत्स, नायर, अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार, राजपूत इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: आदित्य सेंगर News publisher name | Date: 06-07-2026 News publication date | Time: 02:28 PM News publication time | Views: 88 Number of times this news has been viewed | District: Chandrapur Related district of the news
Publisher: आदित्य सेंगर News publisher name | Date: 06-07-2026 News publication date | Time: 02:28 PM News publication time | Views: 88 Number of times this news has been viewed | District: Chandrapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement