चेतना विद्यालय देगलूर येथे नुकता अमृत वर्गाचा शुभारंभ झाला.
लहान वयातच संस्कारांची रुजवण व्हावी व प्रत्येक लहान बालक उद्याच्या भारताचा उत्तम नागरिक व्हावे, कुटुंबाचा, गावाचा व पर्यायाने देशाचा विकास करण्यासाठी हातभार लावेल, या संकल्पनेच्या माध्यमातून अमृत संस्थेमार्फत "अमृत वर्ग" संस्कार वर्गाचे आयोजन करण्यात येत आहे. आज देगलूर येथील चेतना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत अमृत वर्गाची सुरुवात झाली आहे. छोट्या छोट्या उद्बोधक गोष्टी व खेळांतून मुलांचा बौद्धिक आणि शारीरिक विकास व्हावा, या हेतूने हा संस्कार वर्ग घेण्यात येतो. संस्कारक्षम वयामध्ये मुलांना जीवनमूल्ये व प्रामाणिकपणा यांविषयी माहिती मिळावी आणि एकंदर मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा, हाच या अमृत वर्गांचा उद्देश आहे.
हा अमृत वर्ग विद्यालयातील शिक्षिका सौ. मिथिला महाजन घेत आहेत.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment