उत्पन्नाचा दाखला मोफत; अमृत संस्थेची नागरिकांसाठी विशेष सेवा

संस्थेमार्फत फलटण व बारामती येथे मोफत शासकीय दाखला शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

उत्पन्नाचा दाखला मोफत; अमृत संस्थेची नागरिकांसाठी विशेष सेवा मुख्य फोटो
मुख्य फोटो

फलटण व बारामतीमध्ये AMRUT संस्थेचे मोफत शासकीय दाखला शिबिर; नागरिकांसाठी सुवर्णसंधी फलटण/बारामती : शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले शासकीय दाखले नागरिकांना सुलभपणे उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने AMRUT संस्था मार्फत फलटण व बारामती येथे मोफत शासकीय दाखला शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये उत्पन्नाचा दाखला मोफत काढून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अनेक लाभार्थी केवळ आवश्यक कागदपत्रांच्या अभावामुळे शासकीय योजनांपासून वंचित राहतात. ही बाब लक्षात घेऊन हा लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येत आहे. "लक्षित गटातील एकही व्यक्ती अमृत संस्थेच्या योजनांपासून वंचित राहू नये," या उद्देशाने सातारा जिल्हा उपव्यवस्थापक श्री. अविनाश कुलकर्णी यांनी पुढाकार घेत हा उपक्रम सुरू केला आहे. या शिबिराचा लाभ घेण्यासाठी पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन AMRUT संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. संपर्क: श्री. अविनाश कुलकर्णी सातारा जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत मो.: 7841952681


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/



Publisher: अविनाश कुलकर्णी News publisher name | Date: 03-07-2026 News publication date | Time: 08:02 AM News publication time | Views: 101 Number of times this news has been viewed | District: Satara Related district of the news
Publisher: अविनाश कुलकर्णी News publisher name | Date: 03-07-2026 News publication date | Time: 08:02 AM News publication time | Views: 101 Number of times this news has been viewed | District: Satara Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement