आमदार संजना जाधव यांनी अमृतच्या विविध योजनांची माहिती घेतली यावेळी त्यांनी यांची अमृतच्या उपक्रमांना मदतीची ग्वाही दिली.
आमदार संजना जाधव यांची अमृतच्या उपक्रमांना मदतीची ग्वाही. सिल्लोड, दि. १ : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृतच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हा उपव्यवस्थापक योगेश रोडे यांनी कन्नडच्या आमदार संजना जाधव यांची भेट घेतली. यावेळी रोडे यांनी अमृतच्या माध्यमातून लक्षित गटातील नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच कन्नड तालुक्यात विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्याचा मानस असून त्यासाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. यावर आमदार संजना जाधव यांनी अमृतच्या उपक्रमांना आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली. "अमृतच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या चांगल्या उपक्रमांसाठी माझ्याकडून जी मदत अपेक्षित असेल ती निश्चितपणे करण्यात येईल. या संदर्भात तुम्ही केव्हाही संपर्क साधू शकता," असे त्यांनी सांगितले. या भेटीदरम्यान रोडे यांनी आमदार जाधव यांना 'अमृत वर्ग', 'अमृत कुटुंब संवाद' या उपक्रमांची माहिती दिली. तसेच आगामी काळात आयोजित करण्यात येणाऱ्या दुर्गोत्सव कार्यक्रमाबाबतही माहिती देण्यात आली. अमृतच्या विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांचे आमदार जाधव यांनी कौतुक करून भविष्यातही सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment