अमृतच्या अमृत मानस मित्र प्रशिक्षण - विवेकानंद कॉलेजच्या मानसशास्त्र विभागाशी भेट

विवेकानंद आर्ट्स, सरदार दिलीपसिंग कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, समर्थनगर येथे भेट देऊन उपप्राचार्य तथा मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. रवींद्र शिंदे आणि सहाय्यक प्राध्यापक व क्लिनिकल सायकोलॉजिस्ट डॉ. महेश मरकड यांची भेट घेण्यात आली.

अमृतच्या अमृत मानस मित्र प्रशिक्षण - विवेकानंद कॉलेजच्या मानसशास्त्र विभागाशी भेट  मुख्य फोटो
मुख्य फोटो

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती देण्यासाठी आज विवेकानंद आर्ट्स, सरदार दिलीपसिंग कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, समर्थनगर येथे भेट देण्यात आली.

यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य तसेच मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. रवींद्र शिंदे आणि सहाय्यक प्राध्यापक व क्लिनिकल सायकोलॉजिस्ट डॉ. महेश मरकड यांची जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे आणि अमृत सखी रुचा शर्मा यांनी भेट घेतली.

या भेटीत 'अमृत मानस मित्र' या उपक्रमाची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या इतर योजना आणि उपक्रमांचीही माहिती सरांना देण्यात आली. सरांनी सर्व माहिती समजून घेत उपक्रमांचे कौतुक केले.

अमृत मानस मित्र प्रशिक्षणासाठी मानसशास्त्र विभागातील लक्षित गटातील विद्यार्थ्यांना जोडून देण्यासाठी महाविद्यालयाकडून सहकार्य करण्यात येईल, असे यावेळी डॉ. रवींद्र शिंदे आणि डॉ. महेश मरकड यांनी सांगितले.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Rucha S. Sharma News publisher name | Date: 02-07-2026 News publication date | Time: 06:11 PM News publication time | Views: 196 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Rucha S. Sharma News publisher name | Date: 02-07-2026 News publication date | Time: 06:11 PM News publication time | Views: 196 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement