अमृत ड्रोन मिशन प्रशिक्षणाची बॅच यशस्वीरीत्या पूर्ण; विभागीय व्यवस्थापकांनी केली प्रत्यक्ष पाहणी

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या अमृत ड्रोन मिशन अंतर्गत आयोजित ड्रोन पायलट प्रशिक्षणाची अमरावतीतील सद्य बॅच आज यशस्वीरीत्या पूर्ण झाली.

अमृत ड्रोन मिशन प्रशिक्षणाची बॅच यशस्वीरीत्या पूर्ण; विभागीय व्यवस्थापकांनी केली प्रत्यक्ष पाहणी मुख्य फोटो
अमृत ड्रोन मिशन प्रशिक्षणाची बॅच यशस्वीरीत्या पूर्ण; विभागीय व्यवस्थापकांनी केली प्रत्यक्ष पाहणी अतिरिक्त फोटो

प्रशिक्षणाच्या अंतिम दिवशी अमृतचे अमरावती विभागीय व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर यांनी प्रशिक्षण केंद्राला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी त्यांनी प्रशिक्षणार्थी लाभार्थ्यांशी थेट संवाद साधत प्रशिक्षणादरम्यान आलेल्या अडचणी, प्रशिक्षणाचा अनुभव, शिकविण्यात आलेले विषय, प्रत्यक्ष प्रात्यक्षिके तसेच भविष्यातील रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींबाबत सविस्तर चर्चा केली. लाभार्थ्यांनी प्रशिक्षणाबाबत समाधान व्यक्त करत आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरल्याचे सांगितले.


विभागीय व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर यांनी प्रशिक्षणाच्या गुणवत्तेचा आढावा घेत प्रशिक्षण संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. तसेच लाभार्थ्यांनी या कौशल्याचा प्रभावी वापर करून शेती, उद्योग व विविध क्षेत्रांत रोजगाराच्या नव्या संधी निर्माण कराव्यात, असे आवाहन केले.वेळी अमृतचे अमरावती विभागीय व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर तसेच जिल्हा व्यवस्थापक ऋषिकेश कथलकर उपस्थित होते. दोन्ही अधिकाऱ्यांनी प्रशिक्षणार्थींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत अमृतच्या विविध रोजगाराभिमुख योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. अमृत ड्रोन मिशनच्या माध्यमातून युवकांना आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाचे कौशल्य उपलब्ध करून देत त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा प्रयत्न असून, या प्रशिक्षण उपक्रमाला लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/


Publisher: ऋषिकेश हरिष कथलकर News publisher name | Date: 02-07-2026 News publication date | Time: 06:03 PM News publication time | Views: 43 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news
Publisher: ऋषिकेश हरिष कथलकर News publisher name | Date: 02-07-2026 News publication date | Time: 06:03 PM News publication time | Views: 43 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement