मिळाला मोफत ड्रोन मेंटेनन्स प्रशिक्षणाचा लाभ; ड्रोन उड्डाणाचा परवानाही प्राप्त.
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या ड्रोन प्रशिक्षणाचा लाभ परतूर येथील कु. वैदेही विष्णुपंत नंद यांना मिळाला आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवक-युवतींसाठी हे प्रशिक्षण अमृत संस्थेकडून पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आले. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर कु. वैदेही नंद यांनी त्यांचे वडील श्री. विष्णुपंत नंद यांच्यासह अमृतच्या जालना जिल्हा कार्यालयाला भेट दिली. यावेळी जिल्हा व्यवस्थापक श्री. नितीन खेकाळे यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी वैदेही यांनी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कौशल्य प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल अमृत संस्थेचे आभार मानले. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर ड्रोन उड्डाणासाठी आवश्यक असलेला अधिकृत परवानाही (Drone Pilot Certificate) त्यांना प्राप्त झाला आहे. ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर कृषी, उद्योग, सर्वेक्षण, आपत्ती व्यवस्थापन तसेच विविध सेवा क्षेत्रांमध्ये वेगाने वाढत असून, या क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची मोठी मागणी निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेऊन अमृत संस्थेमार्फत विविध कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम आणि योजना राबविण्यात येत आहेत. अमृतच्या लक्षित घटकांतील पात्र युवक-युवतींनी या प्रशिक्षणांचा व योजनांचा लाभ घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्री. नितीन खेकाळे यांनी केले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment