हरित ऊर्जेच्या दिशेने अमृतचे मोठे पाऊल; 'अमृत ईव्ही चार्जिंग स्टेशन' योजना नाशिक जिल्ह्यातील युवकांसाठी स्वयंरोजगाराची सुवर्णसंधी

हरित ऊर्जा, स्वच्छ पर्यावरण आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेच्या माध्यमातून राज्यभर ईव्ही (इलेक्ट्रिक वाहन) चार्जिंग स्टेशन व्यवसाय प्रोत्साहन उपक्रम राबविण्यात येत आहे.

हरित ऊर्जेच्या दिशेने अमृतचे मोठे पाऊल; 'अमृत ईव्ही चार्जिंग स्टेशन' योजना नाशिक जिल्ह्यातील युवकांसाठी स्वयंरोजगाराची सुवर्णसंधी मुख्य फोटो
मुख्य फोटो

हरित ऊर्जा, स्वच्छ पर्यावरण आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेच्या माध्यमातून राज्यभर ईव्ही (इलेक्ट्रिक वाहन) चार्जिंग स्टेशन व्यवसाय प्रोत्साहन उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमातून युवक, महिला उद्योजक, स्वयं सहाय्यता गट (एसएचजी), एमएसएमई उद्योजक, शेतकरी उत्पादक गट तसेच ग्रामीण भागातील इच्छुक उद्योजकांना प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन, व्यवसाय सल्ला आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.

अमृतच्या या विशेष उपक्रमांतर्गत सहभागी लाभार्थ्यांना ईव्ही क्षेत्राविषयी मूलभूत ते प्रगत प्रशिक्षण, व्यवसाय नियोजन, प्रकल्प अहवाल तयार करणे, चार्जिंग स्टेशन स्थापनेसाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन, शासनाच्या विविध योजनांची माहिती, बाजारपेठेचा अभ्यास आणि व्यवसाय व्यवस्थापनाचे मार्गदर्शन दिले जाणार आहे. या क्षेत्रातील भारतीय स्वदेशी कंपन्या आणि तज्ञ मार्गदर्शकांच्या सहाय्याने हा उपक्रम यशस्वी केला जाणार आहे. याशिवाय अमृतच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभही पात्र लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यामुळे व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळण्यास मदत होणार आहे.

पात्रता व अटी:- या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी युवक-युवती, महिला उद्योजक, स्वयं सहाय्यता गट, एमएसएमई उद्योजक, शेतकरी उत्पादक गट, ग्रामीण उद्योजक तसेच स्वतःचा उद्योग सुरू करू इच्छिणारे नागरिक पात्र राहतील. अमृतच्या वैयक्तिक व्याज परतावा योजनेचा लाभ घेण्यासाठी अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांसाठी आवश्यक असलेल्या पात्रता व अटी लागू राहतील.

स्वयंरोजगारासाठी विशेष सहाय्य:- स्वतःचा अमृत ईव्ही चार्जिंग स्टेशन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांना अमृतकडून आवश्यक मार्गदर्शन, व्यवसाय सल्ला, मदत तसेच अमृतच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ दिला जाईल. त्यामुळे नवोदित उद्योजकांना व्यवसाय उभारण्यासाठी विशेष मदत मिळणार आहे.

कुठे आणि कसा अर्ज करायचा? :- अमृत ईव्ही चार्जिंग स्टेशन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अमृत संस्थेच्या - mahaamrut.org.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन, ‘योजना’ या विभागात, 'विशेष योजना' या मेनू खाली 'EV charging Station Partner' मध्ये ऑनलाइन अर्ज करावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक राहील. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा. वर नमूद केलेल्या संकेतस्थळावर राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा व्यवस्थापकांचे संपर्क क्रमांक आणि कार्यालयाचा पत्ता व इतर तपशील दिलेला आहे.

ईव्ही चार्जिंग स्टेशन व्यवसायामध्ये भविष्यातील संधी :- चार्जिंग स्टेशन उभारणी, संचालन, व्यवस्थापन, उपकरणांची देखभाल, सौरऊर्जेवर आधारित चार्जिंग सुविधा, ग्रीन एनर्जी सेवा, तांत्रिक सेवा, फ्रँचायझी व्यवसाय आणि ग्रामीण चार्जिंग हब उभारणी अशा विविध संधी उपलब्ध आहेत.

प्रशिक्षण/ मार्गदर्शनाचे स्वरूप:- ईव्ही क्षेत्राविषयी मूलभूत ते प्रगत प्रशिक्षण, व्यवसाय नियोजन, प्रकल्प अहवाल तयार करणे, तांत्रिक मार्गदर्शन, बाजारपेठेचा अभ्यास आणि व्यवसाय व्यवस्थापनाचे प्रशिक्षण, तसेच पूरक व्यवसाय करण्यासंदर्भात मार्गदर्शन दिले जाईल.

उपक्रमांतर्गत आर्थिक सहाय्याची सुविधा :- अमृतच्या लक्षित गटातील पात्र उमेदवारांना अमृतच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ उपलब्ध होऊ शकेल.

रोजगार व करिअरच्या उपलब्ध संधी:- ऊर्जा व्यवस्थापन, चार्जिंग नेटवर्क ऑपरेशन, इलेक्ट्रिकल देखभाल, ग्रीन एनर्जी प्रकल्प, ईव्ही उपकरण विक्री व सेवा तसेच उद्योजकता विकास या क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. प्रशिक्षणासाठी आवश्यक कागदपत्रे :- • आधार कार्ड • पॅन कार्ड • EWS / उत्पन्न प्रमाणपत्र (Income Certificate) • अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) • शाळा सोडल्याचा दाखला / ट्रान्सफर सर्टिफिकेट (School Leaving / TC) • बारावीची गुणपत्रिका • पासपोर्ट आकाराचा फोटो • स्वाक्षरी टीप : अमृतच्या लक्षित गटातील पात्र नागरिकांसाठी अमृतच्या नियमानुसार आवश्यक पात्रता व अटी लागू राहतील. अधिक माहितीसाठी संपर्क योजनेबाबत अधिक माहितीसाठी अथवा अर्ज प्रक्रियेसंदर्भात इच्छुकांनी खालील पत्त्यावर संपर्क साधावा. पत्ता : अमृत विभाग व जिल्हा कार्यालय, १, सदानंद सोसायटी, स्वप्निल पार्क, टिळकवाडी, नाशिक ४२२००२. संपर्क : 9112228770/ 8830046256 अमृतच्या अधिकृत संकेतस्थळावर राज्यातील सर्व जिल्हा व्यवस्थापकांचे संपर्क क्रमांक, कार्यालयाचे पत्ते व इतर माहिती उपलब्ध आहे. लिंक खाली दिली आहे. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Mangesh Khadilkar News publisher name | Date: 02-07-2026 News publication date | Time: 05:51 PM News publication time | Views: 84 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Mangesh Khadilkar News publisher name | Date: 02-07-2026 News publication date | Time: 05:51 PM News publication time | Views: 84 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement