अकोला जिल्ह्यामध्ये अमृत व MCED यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी ६ जुलैपासून ॲडव्हान्स ब्युटी पार्लर प्रशिक्षणाला प्रारंभ होत असून, आधुनिक कौशल्यांसह स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन दिले जाणार आहे.
महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी (अमृत), पुणे व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) यांच्या संयुक्त विद्यमाने अकोला जिल्ह्यात महिलांसाठी ॲडव्हान्स ब्युटी पार्लर प्रशिक्षण बॅचचा शुभारंभ दि. ६ जुलै २०२६ रोजी होत आहे. या प्रशिक्षणाद्वारे महिलांना आधुनिक सौंदर्य सेवा क्षेत्रातील कौशल्ये आत्मसात करून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. प्रशिक्षणामध्ये ॲडव्हान्स फेशियल, ब्रायडल मेकअप, हेअर कटिंग, हेअर स्टायलिंग, स्किन केअर, नेल आर्ट, सलून व्यवस्थापन तसेच उद्योजकता विषयक मार्गदर्शनाचा समावेश असून, अनुभवी प्रशिक्षकांमार्फत प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले जाणार आहे. सौंदर्य सेवा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या अकोला जिल्ह्यातील महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी (अमृत), पुणे व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) यांच्या वतीने करण्यात आले आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
अधिक माहितीसाठी अमृतच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा. जिल्हा संपर्क यादी वरील लिंकवर उपलब्ध आहे.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment