वरद बालक मंदिर,परभणी येथे अमृत वर्ग उत्साहात संपन्न

वरद बालक मंदिर येथे अमृत संस्थेच्या वतीने अमृत वर्ग उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला.

वरद बालक मंदिर,परभणी येथे अमृत वर्ग उत्साहात संपन्न मुख्य फोटो
वरद बालक मंदिर,परभणी येथे अमृत वर्ग उत्साहात संपन्न अतिरिक्त फोटो

वरद बालक मंदिर येथे अमृत संस्थेच्या वतीने अमृत वर्ग उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना, बालगीते आणि प्रेरणादायी घोषणांनी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत संपूर्ण वातावरण आनंदमय केले. या अमृत वर्गाचे मार्गदर्शन अमृत सखी मयुरी टेळकीकर आणि अनंत जोगदंड यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत संस्कार, शिस्त, व्यक्तिमत्त्व विकास, चांगल्या सवयी आणि सकारात्मक विचार यांचे महत्त्व सोप्या व प्रभावी पद्धतीने सांगितले. विविध कृती, खेळ आणि संवादात्मक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांनी वर्गाचा आनंद घेतला. उपस्थित शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी अमृत वर्गाचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच चालना मिळत असल्याचे मत व्यक्त केले. या अमृत वर्गाचा सर्व चिमुकल्यांनी भरपूर आनंद घेतला.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Mayuri Telkikar News publisher name | Date: 02-07-2026 News publication date | Time: 02:25 PM News publication time | Views: 49 Number of times this news has been viewed | District: Parbhani Related district of the news
Publisher: Mayuri Telkikar News publisher name | Date: 02-07-2026 News publication date | Time: 02:25 PM News publication time | Views: 49 Number of times this news has been viewed | District: Parbhani Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement