अमृत कुटुंब संवादातून संस्कार, संवाद आणि स्वावलंबनाचा संदेश

अमृत कार्यालय, नांदेड यांच्या "अमृत कुटुंब संवाद" या उपक्रमांतर्गत विद्युत नगर येथील श्री मुकुंद धारापुरकर यांच्या कुटुंबाची सदिच्छा भेट घेण्यात आली.

अमृत कुटुंब संवादातून संस्कार, संवाद आणि स्वावलंबनाचा संदेश  मुख्य फोटो
मुख्य फोटो

अमृतच्या योजना, प्रशिक्षण व ईव्ही चार्जिंग उपक्रमाची माहिती; आजोबांच्या ज्ञानेश्वरी लेखन व गोदावरी परिक्रमेच्या तयारीने सर्वांना प्रेरणा नांदेड अमृत कार्यालय, नांदेड यांच्या "अमृत कुटुंब संवाद" या उपक्रमांतर्गत विद्युत नगर येथील श्री मुकुंद धारापुरकर यांच्या कुटुंबाची सदिच्छा भेट घेण्यात आली. या भेटीत कुटुंबातील सर्व सदस्यांशी मनमोकळा संवाद साधून भारतीय संस्कार, कुटुंबातील सुसंवाद, सामाजिक बांधिलकी आणि सकारात्मक जीवनमूल्यांवर चर्चा करण्यात आली. भेटीदरम्यान अमृतच्या विविध लोककल्याणकारी योजना, कौशल्य विकास प्रशिक्षण, रोजगाराभिमुख अभ्यासक्रम तसेच युवक-युवती व महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली. यासोबतच अमृत कार्यालयात सुरू झालेल्या ईव्ही चार्जिंग स्टेशन, इलेक्ट्रॉनिक्स व आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित प्रशिक्षण उपक्रमांची माहिती देत भविष्यातील रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांशी झालेला संवाद विशेष प्रेरणादायी ठरला. त्यांनी सांगितले की, त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात दोन वेळा संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण केली आहे. सध्या ते गोदावरी परिक्रमेची तयारी करत असून, परिक्रमेचा अभ्यास अधिक सखोल व्हावा यासाठी गोदावरी नदीचा इतिहास, धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व, तसेच संपूर्ण माहिती स्वतः लिहून संकलित करत आहेत. त्यांच्या ज्ञानसाधनेची आणि अध्यात्माप्रती असलेल्या निष्ठेची उपस्थितांनी मनापासून प्रशंसा केली. श्री मुकुंद धारापुरकर यांच्या कुटुंबीयांनी अमृतच्या उपक्रमांचे स्वागत करत अशा भेटींमुळे कुटुंबातील संवाद वाढतो, संस्कार दृढ होतात आणि नव्या पिढीला योग्य दिशा मिळते, असे मत व्यक्त केले. अमृतचा "कुटुंब संवाद" हा उपक्रम केवळ योजनांची माहिती देणारा नसून, कुटुंब, संस्कार, कौशल्य आणि समाज यांना जोडणारा एक प्रभावी जनजागृती उपक्रम ठरत आहे. घोषवाक्य : "संवादातून संस्कार... संस्कारातून सक्षम कुटुंब... आणि सक्षम कुटुंबातून समृद्ध राष्ट्र!"

Publisher: Manisha Kunsavlkar News publisher name | Date: 02-07-2026 News publication date | Time: 01:06 PM News publication time | Views: 47 Number of times this news has been viewed | District: Nanded Related district of the news
Publisher: Manisha Kunsavlkar News publisher name | Date: 02-07-2026 News publication date | Time: 01:06 PM News publication time | Views: 47 Number of times this news has been viewed | District: Nanded Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement