जालना : घनसावंगी तालुक्यातील खालापुरी येथे अमृतच्या वतीने ‘अमृत कुटुंब संवाद –या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
खालापुरी येथे ‘अमृत कुटुंब संवाद’ उपक्रमाचा शुभारंभ
जालना : घनसावंगी तालुक्यातील खालापुरी येथे अमृतच्या वतीने ‘अमृत कुटुंब संवाद – संवाद आणि सुदृढ कुटुंबासाठी एक पाऊल’ या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात कुटुंबातील संवाद, भारतीय संस्कार आणि पिढ्यांमधील नाते दृढ करण्यावर विशेष भर देण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन अमृतचे जालना जिल्हा उपव्यवस्थापक चिंतेश जोशी यांनी केले. या उपक्रमात आजी-आजोबा संवाद कट्टा, एकत्र कुटुंब प्रार्थना, कुटुंब वाचन संस्कृती अभियान, मातृ-पितृ वंदन दिवस, कुटुंबीय खेळ व आनंद मेळावा, भारतीय सण-परंपरा परिचय, कुटुंब आरोग्य व योग सत्र, एक दिवस मोबाईलमुक्त कुटुंब, कुटुंब सेवा अभियान तसेच कुटुंब कौशल्य विकास कार्यशाळा यांसारख्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाचे आयोजन खालापुरी येथील वसंत गुरुजी बल्लाळ व त्यांच्या पत्नी सुनीता बल्लाळ यांच्या निवासस्थानी करण्यात आले. वसंत गुरुजी बल्लाळ हे खालापुरी येथील मत्स्योदरी देवी संस्थान, अंबडचे विश्वस्त आहेत.
अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी साहेब यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमास राज्य व्यवस्थापक दीपक जोशी, विभागीय व्यवस्थापक अमित सामंत, उपव्यवस्थापक ओंकार शेटे आणि जिल्हा व्यवस्थापक नितीन खेकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात करण्यात आली.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना कुटुंबातील संवाद वाढवणे, भारतीय संस्कार व मूल्ये जपणे, पिढ्यांमधील नाते अधिक दृढ करणे आणि सुसंस्कृत, सुदृढ व आनंदी कुटुंब निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी वसंत गुरुजी बल्लाळ यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, "अमृतच्या माध्यमातून शासकीय योजना घेऊन आमच्या घरापर्यंत कोणी येईल, अशी आम्ही कधी अपेक्षा केली नव्हती. आमच्यासारख्या सामान्य कुटुंबांसाठीही शासनाच्या विविध योजना आहेत, याची माहिती मिळाल्याने आम्हाला खूप आनंद आणि अभिमान वाटत आहे."
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment