संस्कार, शिक्षण आणि आनंदाचा संगम म्हणजे अमृत वर्ग

छत्रपती संभाजीनगर येथील रायझिंग स्टार किड्स स्कूलमध्ये अमृत सखी मंजू कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन अमृत वर्गांचे आयोजन करण्यात आले.

संस्कार, शिक्षण आणि आनंदाचा संगम म्हणजे अमृत वर्ग मुख्य फोटो
संस्कार, शिक्षण आणि आनंदाचा संगम म्हणजे अमृत वर्ग अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर, दि. १ जुलै २०२६ : रायझिंग स्टार किड्स स्कूल, छत्रपती संभाजीनगर येथे अमृत सखी मंजू कुलकर्णी यांनी दोन अमृत वर्गांचे उत्साहपूर्ण आयोजन करून विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक व बौद्धिक उपक्रमांचे मार्गदर्शन केले. वर्गाची सुरुवात प्रार्थनेने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांना बालगीते, फळांची नावे तसेच विविध घोषणा शिकविण्यात आल्या. यासोबतच विद्यार्थ्यांच्या विचारशक्ती, स्मरणशक्ती, एकाग्रता आणि निर्णयक्षमतेचा विकास व्हावा या उद्देशाने विविध बौद्धिक खेळ घेण्यात आले. अमृत सखी मंजू कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना आनंददायी वातावरणात शिकवत प्रत्येक उपक्रमात सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहित केले. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने व आनंदाने सर्व उपक्रमांमध्ये सहभाग नोंदविला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, समूहभावना, बौद्धिक क्षमता आणि शिकण्याची आवड वाढीस लागली. रायझिंग स्टार किड्स स्कूलमध्ये आयोजित हा अमृत वर्ग विद्यार्थ्यांसाठी ज्ञान, संस्कार आणि आनंद यांचा सुंदर संगम ठरला. अमृत संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या या संस्कार वर्गांमुळे संस्कारक्षम वयामध्ये मुलांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळत आहे. ह्या वर्गांमुळे मुलांच्या अभ्यासात सुद्धा मदत मिळते.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Manju kulkarni News publisher name | Date: 01-07-2026 News publication date | Time: 12:58 PM News publication time | Views: 78 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Manju kulkarni News publisher name | Date: 01-07-2026 News publication date | Time: 12:58 PM News publication time | Views: 78 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement