लातूरमधील यशस्वी उद्योजक श्री आशीष बाहेती यांनी अमृत कार्यालय, लातूर येथे भेट दिली. यावेळी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी अमृत संस्थेच्या विविध शासकीय योजना , अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, पात्रता निकष तसेच प्रशिक्षण व आर्थिक सहाय्याच्या संधींची सविस्तर माहिती दिली.
लातूर: शासनाच्या विविध रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्य विकास व उद्योजकता विकास योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी लातूरमधील यशस्वी उद्योजक श्री. आशीष बाहेती यांनी अमृत कार्यालय, लातूर येथे भेट दिली. यावेळी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी अमृत संस्थेच्या विविध शासकीय योजना, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, पात्रता निकष तसेच प्रशिक्षण व आर्थिक सहाय्याच्या संधींची सविस्तर माहिती दिली.
भेटीदरम्यान त्यांनी अमृत संस्थेद्वारे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांविषयी समाधान व्यक्त केले. युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने कार्यालयाचे कार्य महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच शासनाच्या योजनांची माहिती अधिकाधिक नागरिक, युवक आणि इच्छुक उद्योजकांपर्यंत पोहोचावी यासाठी आपल्या स्तरावर जनजागृती व प्रचार-प्रसार करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी शासनाच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अमृत कार्यालयामार्फत सातत्याने मार्गदर्शन, समुपदेशन व माहिती सेवा उपलब्ध करून दिल्या जात असल्याची माहिती देण्यात आली.
भेटीच्या शेवटी उद्योजकांनी अमृत कार्यालयाच्या कार्याचे कौतुक करत भविष्यातही अशा लोकाभिमुख उपक्रमांना आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
अधिक माहितीसाठी: श्री शुभम मुळजकर जिल्हा व्यवस्थापक,लातूर संपर्क क्रमांक:7391065470 पत्ता: पहिला मजला ,पित्रछया बिल्डिंग, मयुरेश्वर अपार्टमेंट ,सिग्नल कॅम्प, विद्यानगर ,लातूर तालुका, जिल्हा लातूर-413512.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment