व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या युवक-युवती, महिला, शेतकरी आणि नवउद्योजकांसाठी अमृतचा विशेष उपक्रम; अनुभवी तज्ज्ञांकडून मिळणार प्रत्यक्ष मार्गदर्शन
धुळे जिल्ह्यातील उद्योजकतेला चालना देण्यासाठी आणि नवउद्योजक घडवण्यासाठी अमृत (Academy of Maharashtra Research, Upliftment and Training) संस्थेतर्फे Entrepreneurship Development Program (EDP) ची नवीन बॅच लवकरच सुरू होत आहे. त्यासाठी नाव नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच तारीख निश्चित केली जाईल. व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेल्या युवक-युवती, महिला, शेतकरी, स्वयंरोजगार इच्छुक आणि स्टार्टअपची संकल्पना असलेल्या नागरिकांसाठी हा अभ्यासक्रम सुवर्णसंधी ठरणार आहे.
अमृत EDP अंतर्गत सहभागी उमेदवारांना व्यवसायाची निवड, उद्योग नियोजन, प्रकल्प अहवाल तयार करणे, आर्थिक व्यवस्थापन, मार्केटिंग, डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर, ग्राहक व्यवस्थापन, ब्रँडिंग, शासकीय योजना, बँक कर्ज प्रक्रिया तसेच उद्योग उभारणीतील विविध टप्प्यांचे सखोल प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या अभ्यासक्रमात केवळ सैद्धांतिक ज्ञानावर भर न देता प्रत्यक्ष उद्योग उभारणीसाठी आवश्यक व्यावहारिक मार्गदर्शन, अनुभवी उद्योगतज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि यशस्वी उद्योजकांशी संवादाची संधीही उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे सहभागींचा आत्मविश्वास वाढून त्यांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी योग्य दिशा मिळणार आहे.
अधिकाधिक युवकांनी रोजगार शोधणारे न बनता रोजगार निर्माण करणारे उद्योजक व्हावे, या उद्देशाने अमृत संस्थेने हा उपक्रम हाती घेतला आहे. अमृत EDPची ठळक वैशिष्ट्ये ✔ व्यवसाय सुरू करण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन ✔ अनुभवी उद्योगतज्ज्ञांचे प्रशिक्षण ✔ व्यवसाय नियोजन व प्रकल्प अहवाल तयार करण्याचे मार्गदर्शन ✔ मार्केटिंग, ब्रँडिंग आणि डिजिटल व्यवसाय कौशल्ये ✔ शासकीय योजना व बँक कर्ज प्रक्रियेची माहिती ✔ व्यक्तिमत्त्व विकास व नेतृत्व कौशल्य प्रशिक्षण ✔ उद्योग उभारणीसाठी प्रत्यक्ष सहाय्य अधिक माहितीसाठी संपर्क : अमृत जिल्हा कार्यालय धुळे , २६,महाराणा प्रताप कॉलनी,जुने चिरंतन हॉस्पिटल जवळ देवपूर, धुळे संपर्क क्र. – 9112228772 / 9822829555
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment