अहिल्यानगर मध्ये ३,४ व ५ जुलै रोजी पुन्हा भरणार अमृत पेठ -थेट बाजारपेठचे आयोजन करण्यात आले आहे.
"अमृत(महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था)-अहिल्यानगर व "प्रतिबिंब संस्था"-अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर मध्ये पुन्हा भरणार अमृत पेठ -थेट बाजारपेठ.. दिनांक :- ०३,०४ व ०५ जुलै २०२६ रोजी. "दर्जेदार खरेदीची खात्री -अमृत पेठ तुमच्यासाठी"..
अहिल्यानगर : स्थानिक उत्पादकांनी तयार केलेल्या दर्जेदार उत्पादनांच्या विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र संशोधन,उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे 'अमृतपेठ - थेट बाजारपेठ' हा विशेष उपक्रम राबवला जातो. अहिल्यानगरमध्ये मार्च व मे महिन्यात भरलेल्या अमृतपेठ थेट बाजारपेठेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा या उपक्रमाचे आयोजन अहिल्यानगरमध्ये करण्यात आले असून, 3,4 व 5 जुलै 2026 रोजी ही अमृतपेठ थेट बाजारपेठ भरणार आहे. अमृत संस्था-अहिल्यानगर व प्रतिबिंब संस्था-अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वदेशी आणि दर्जेदार उत्पादने हे अमृतपेठ चे वैशिष्ट्य असून,ग्राहक आणि उत्पादक अशा दोघांसाठीही हा उपक्रम फायद्याचा ठरतो. दर्जेदार व स्वदेशी खरेदीसाठी जास्तीत जास्त नागरिकांनी सहकुटुंब अवश्य भेट द्या. "अमृतपेठ थेट बाजारपेठ" दिनांक : 3,4,व 5 जुलै 2026 स्थळ :-शमी गणपती मंदिर हॉल,दिल्लीगेट,अहिल्यानगर-414003 ▪️संपर्क क्रमांक :-9284930674/9112228769
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 1 Comments
Prasad Gubbi
लक्षित घटकांच्या व्यतिरिक्त ज्यांचे उत्पन्न आठ लाखाचे वरती आहे परंतु ते काही बिजनेस किंवा व्यवसाय करू इच्छिता परंतु त्यांना कागदपत्र करण्यासाठी मंजुरी घेण्यासाठी तसेच बँकांमध्ये त्यांची पत निर्माण करण्यासाठी बऱ्याच वेळा अडचणी येतात याबाबत अमृत संस्थेकडून अशा घटकांना काय मदत मिळू शकते कृपया मार्गदर्शन करावे
येवला जिल्हा नाशिक
Write a Comment