अहिल्यानगर मध्ये "अमृत संवाद सेतू" उपक्रमामुळे प्रशासन आणि विद्यार्थ्यांमध्ये घडला सुसंवाद..!
अमृत संवाद सेतू' उपक्रमाअंतर्गत अहिल्यानगर येथील विद्यार्थ्यांनी घेतला तहसील कार्यालयात होणाऱ्या कामाचा प्रत्यक्ष अनुभव.
अहिल्यानगर मध्ये "अमृत संवाद सेतू" उपक्रम मुळे प्रशासन आणि विद्यार्थ्यांमध्ये घडला सुसंवाद..!
अमृतसंवाद सेतू' उपक्रमांतर्गत अहिल्यानगरमधील विद्यार्थ्यांनी अनुभवले तहसील कार्यालयाचे कामकाज.
अहिल्यानगर : महाराष्ट्रातील युवक-युवतींना शासकीय कार्यालयीन कामकाजाची प्रत्यक्ष ओळख व्हावी, प्रशासकीय यंत्रणेतील पदे व जबाबदाऱ्या समजून घेता याव्यात आणि प्रशासन व नागरिक यांच्यातील सुसंवाद व्हावा, या उद्देशाने 'अमृत' (Academy of Maharashtra Research Upliftment and Training) संस्थेच्या वतीने "अमृत संवाद सेतू उपक्रम" राबविण्यात येत आहे. या नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रमांतर्गत दिनांक २९ जून २०२४ रोजी नगर येथील १० विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयाला दुपारी १ ते २ दरम्यान भेट दिली.
'अमृत संवाद सेतू' उपक्रमांतर्गत अहिल्यानगर येथील विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयात होणाऱ्या कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना कार्यालयातील आवक-जावक विभाग, महसूल विभाग, विविध शासकीय दाखले मंजुरी विभाग आणि लेखा विभाग याची प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. मा. तहसीलदार स्वप्नील ढवळे साहेब यांनी तहसील कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी सौ. पारगावकर मॅडम यांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पाठवले; त्यांनी विभागाच्या कामकाजाची अतिशय महत्त्वाची माहिती देऊन मार्गदर्शन केले.
शासकीय कार्यालयांची भीती मनातून काढून एक जबाबदार नागरिक बनण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. तसेच, तरुणांना प्रशासनाशी जोडणाऱ्या या उपक्रमाबद्दल 'अमृत' संस्थेचे मनापासून अभिनंदन करत त्यांनी अत्यंत आनंद व्यक्त केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपले अनेक प्रश्न प्रशासनासमोर मांडता आले आणि त्यांची उत्तरेही मिळाली.
या प्रसंगी अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक श्री. सागर भोपे, अमृत मित्र वैभव कुलकर्णी, शरद क्षीरसागर, संदीप देशपांडे, गौरी कुलकर्णी तसेच सुजल झुंजारे, अर्चना बनकर, वर्षा सागडे आणि विद्यार्थी उपस्थित होते. त्याचप्रमाणे सर्वांनी अमृत कार्यालयालाही भेट दिली. अमृत कार्यालयात कसे कामकाज चालते तेही त्यांना समजविण्यात आले. अमृतमार्फत कोणत्या योजना कार्यान्वित आहेत याची सर्व माहिती देण्यात आली.
प्रशासकीय यंत्रणा इतक्या जवळून अनुभवता आल्याबद्दल सहभागी विद्यार्थ्यांनी 'अमृत' संस्थेचे सर्वांनी आभार मानले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment