गोरेगावत संपन्न झाली अमृत संस्थेमार्फत अमृतपेठ थेट स्वदेशी बाजारपेठ

महाराष्ट्र संशोधन, उन्नती प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थेचा ‘अमृत पेठ – थेट स्वदेशी बाजारपेठ’ उपक्रम रायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथे नुकताच संपन्न झाला.

गोरेगावत संपन्न झाली अमृत संस्थेमार्फत अमृतपेठ थेट स्वदेशी बाजारपेठ मुख्य फोटो
गोरेगावत संपन्न झाली अमृत संस्थेमार्फत अमृतपेठ थेट स्वदेशी बाजारपेठ अतिरिक्त फोटो

अमृतपेठ चे ऊदघाटन डॉ.श्री नंदकुमार मराठे, गोरेगावचे सरपंच श्री जुबेर अब्बासी, श्री विकास गायकवाड यांच्या हस्ते झाले. डॉक्टर मराठे उद्योजकांशी संवाद साधताना म्हणाले की, "आपल्या गावात विविध उत्पादके तयार झाले पाहिजेत. अमृत संस्थेमार्फत मिळणारे व्यवसाय योग्य प्रशिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वावलंबी व आत्मनिर्भर बनणे ही काळाची गरज आहे. राज्यसरकर मार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आसलेले विविध योजनांचा सर्वानी लाभ घेतला पाहिजे".

महाराष्ट्र शासनाच्या अमृत या स्वायत्त संस्थे मार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठी संधी आपण निर्माण करून देत असतो. या संस्थेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, लघुउद्योगाला चालना आणि स्वयंरोजगार निर्मिती याकरिता स्थानिक लघु उद्योजक, लक्षित गटातील वीविध व्यवसायिक प्रशिक्षण घेतलेल्या लाभार्थ्यांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी, विक्री कौशल्य वाढावे याकरिता व्यवस्थापकीय संचालक (अमृत) यांची संकल्पना असलेली अमृत पेठ- थेट बाजारपेठ चे आयोजन गोरेगावत केले होते. जिल्ह्याच्या विविध तालुक्यातील उद्योजकांनी स्वतःची उत्पादने विक्रीसाठी स्टॉल वर ठेवली होती. त्यात प्रमुख्याने घरगुती पिठे, हस्तकलेच्या वस्तु,इमिटेशन ज्वेलरी, विणकामाच्या वस्तु, घरगुती मसाले, आयुर्वेदिक उत्पादने, सोलर सिस्टम वर चालणारी ऊपकरणे, स्वदेशी टू व्हीलर ,महिलांसाठी हाताने बनवलेल्या पर्स अशी विविध उत्पादने विक्रीसाठी स्टॉल वर ठेवली होती.

संबोधि बौद्ध विहार, गोरेगाव ता. माणगाव जि. रायगड येथे अमृत पेठ शनिवार दि २७ जून ते रविवार दि २८ जून रोजी संपन्न झाली. सकाळी ९ ते रात्री ८ वाजे पर्यन्त बाजारपेठ खुली होती.

यामध्ये प्रमुख आकर्षण ठरले ते महिला पुरुष यांचासाठी झालेल्या “लकी ड्रॉ कुपन”, त्यातून विजेते निवडून त्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली.

सामाजिक बांधिलकी म्हणून आपण पेण येथील सूहीत जीवन ट्रस्ट गतीमंद शाळेचा विनामूल्य स्टॉल दिल होता, गतीमंद मुलांनी बनवलेल्या विविध वस्तु स्टॉल वर विक्रीसाठी ठेवल्या होत्या .

अमृतचे समन्वयक श्री शैलेश मराठे, उपव्यवस्थापक मंगेश ढेबे अमृतसखी जान्हवी साठे तसेच स्थानिक अमृत मित्र सुयश मोने, अमृत सखी अनुश्री ताई यांनी अथक परिश्रम करून अमृतपेठ यशस्वी केली.

अधिक माहिती साठी संपर्क :- रायगड जिल्हा व्यवस्थापक :- ९११२२२८७५९ , श्री शैलेश मराठे:- ९४२३८९२१८२ मंगेश ढेबे:- ८१४९५५२१४३

Publisher: Shailesh Marathe News publisher name | Date: 29-06-2026 News publication date | Time: 02:54 PM News publication time | Views: 91 Number of times this news has been viewed | District: Raigad Related district of the news
Publisher: Shailesh Marathe News publisher name | Date: 29-06-2026 News publication date | Time: 02:54 PM News publication time | Views: 91 Number of times this news has been viewed | District: Raigad Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement