ब्राह्मण महिला मंचाच्या माध्यमातून अमृत संस्थेची माहिती मिळाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील प्रथमेश अमोल खडके यांनी अमृतच्या स्मॉल फोटोग्राफी अँड व्हिडिओ शूटिंग विथ ड्रोन प्रशिक्षणासाठी अर्ज केला. आता त्यांना व्यवसायाची संधी उपलब्ध अझाली आहे.
ब्राह्मण महिला मंचाच्या माध्यमातून मिळाली संधी; अमृतच्या ड्रोन प्रशिक्षणामुळे व्यवसायाची नवी दिशा ब्राह्मण महिला मंचाच्या माध्यमातून महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थेची माहिती मिळाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील प्रथमेश अमोल खडके यांनी अमृतच्या विभागीय व जिल्हा कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी अमृतच्या विविध योजना आणि प्रशिक्षणाची सविस्तर माहिती जाणून घेतली. जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे यांनी ड्रोन प्रशिक्षणासाठी लागणारी कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि पुढील मार्गदर्शन करून संपूर्ण सहकार्य केले. त्यानुसार प्रथमेश खडके यांनी अमृतच्या पोर्टलवर अर्ज भरला. अर्जाची छाननी झाल्यानंतर त्यांची 'स्मॉल फोटोग्राफी अँड व्हिडिओ शूटिंग विथ ड्रोन' या प्रशिक्षणासाठी निवड झाली. हे प्रशिक्षण २ जून ते १२ जून २०२६ या कालावधीत कल्याण येथे पार पडले. प्रथमेश खडके यांनी हे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी अमृतच्या छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय व जिल्हा कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी जिल्हा टीमतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी प्रथमेश खडके म्हणाले, "या प्रशिक्षणातून मला ड्रोनद्वारे फोटो आणि व्हिडिओ शूटिंगचे प्रत्यक्ष ज्ञान मिळाले. पुढे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या डॉक्युमेंटेशन प्रक्रियेत तसेच व्याज परतावा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अमृतकडून वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त युवक-युवतींनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा." अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २४ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
पत्ता : अमृत विभागीय व जिल्हा कार्यालय, पुंडलिक नगर रोड, सेक्टर -४ सिडको, पाण्याच्या टाकीजवळ, छत्रपती संभाजीनगर - ४३१००९
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment