महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (AMRUT) आणि MCED यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या अमृत सूर्यमित्र प्रशिक्षण कार्यक्रमासाठी हिंगोली जिल्ह्यात प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
अमृत सूर्यमित्र प्रशिक्षणासाठी हिंगोलीत प्रवेश प्रक्रिया सुरू सौर ऊर्जा क्षेत्रात युवकांना मिळणार कौशल्य विकासाची संधी; प्रशिक्षण ६ जुलै २०२६ पासून हिंगोली : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (AMRUT) आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या “अमृत सूर्यमित्र प्रशिक्षण कार्यक्रमासाठी” हिंगोली जिल्ह्यात प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सौर ऊर्जा क्षेत्रात कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येणारे हे प्रशिक्षण दि. ६ जुलै २०२६ पासून सुरू होणार आहे. सध्या सौर ऊर्जा क्षेत्रात रोजगार व स्वयंरोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. या पार्श्वभूमीवर युवक-युवतींना आवश्यक तांत्रिक कौशल्य उपलब्ध करून देण्यासाठी अमृतच्या माध्यमातून सूर्यमित्र प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या प्रशिक्षणामध्ये सोलर पीव्ही (Solar PV) प्रणालीची स्थापना, देखभाल व दुरुस्ती, सौर उपकरणांची माहिती, सुरक्षा नियम, प्रत्यक्ष प्रात्यक्षिक प्रशिक्षण तसेच उद्योजकता विकास याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन दिले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना सौर ऊर्जा क्षेत्रात रोजगार मिळविण्यास तसेच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास आवश्यक कौशल्य व मार्गदर्शन मिळणार आहे. प्रशिक्षण कालावधी : दि. ६ जुलै २०२६ ते दि. २४ जुलै २०२६ प्रवेशासाठी इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह विहित मुदतीत अर्ज सादर करावा. प्रशिक्षणासाठी जागा मर्यादित असून, उमेदवारांची निवड “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्त्वावर करण्यात येणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील युवक-युवतींनी या कौशल्य विकासाच्या संधीचा लाभ घेऊन सौर ऊर्जा क्षेत्रात आपले करिअर घडवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : अमृत जिल्हा कार्यालय, हिंगोली प्रशासकीय इमारत, तळमजला, हिंगोली – ४३१५१३ 📞 संपर्क क्रमांक : ७३९१०६५४७१
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना शासकीय संस्था, आयोग किंवा महामंडळ यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment