राजपूत समाजबांधवांनी घेतली अमृत संस्थेच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती

अमृत संस्थेच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती घेतली. तसेच विविध उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

राजपूत समाजबांधवांनी घेतली अमृत संस्थेच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती  मुख्य फोटो
राजपूत समाजबांधवांनी घेतली अमृत संस्थेच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती  अतिरिक्त फोटो

धुळे : महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या अमृत संस्थेच्या विविध लोकहितकारी योजना आणि उपक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी धुळे येथील राजपूत समाजबांधवांनी अमृत संस्थेला सदिच्छा भेट दिली. यावेळी संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक हेमंत पाठक यांनी विविध योजनांची आणि उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. यामध्ये अमृत पेठ, अमृत पर्यटन, अमृत उद्योग, अमृत शेती, अमृत शिक्षण, रोजगार निर्मिती, महिला सक्षमीकरण, स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन तसेच सामाजिक विकासासाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम यांची सविस्तर माहिती दिली. या योजनांमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, युवक, महिला आणि उद्योजकांसाठी उपलब्ध होणाऱ्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. योजनांची माहिती ऐकल्यानंतर उपस्थित राजपूत समाजबांधवांनी अमृत संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचे आणि विकासाभिमुख कार्याचे कौतुक केले. तसेच या योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि आगामी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली. यावेळी उपस्थितांनी विविध योजनांबाबत प्रश्न विचारून समाधानकारक उत्तरे मिळवली. संवादात्मक वातावरणात झालेल्या या भेटीमुळे समाजोपयोगी उपक्रमांबद्दल विश्वास अधिक दृढ झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

विविध योजनेविषयीची सविस्तर माहिती पुढील लिंकवर उपलब्ध असून, त्या लिंकवरूनच योजनेसाठी अर्ज करता येतो. https://app.mahaamrut.org.in/amrut-new/scheme/245 अधिक माहितीसाठी संपर्क : अमृत जिल्हा कार्यालय धुळे , २६,महाराणा प्रताप कॉलनी,जुने चिरंतन हॉस्पिटल जवळ देवपूर, धुळे संपर्क क्र. – 9112228772 / 9822829555


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Hemant Pathak News publisher name | Date: 27-06-2026 News publication date | Time: 01:28 PM News publication time | Views: 92 Number of times this news has been viewed | District: Dhule Related district of the news
Publisher: Hemant Pathak News publisher name | Date: 27-06-2026 News publication date | Time: 01:28 PM News publication time | Views: 92 Number of times this news has been viewed | District: Dhule Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement