सूर्यमित्र प्रशिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू; प्रशिक्षण ६ जुलै २०२६ पासून

लातूर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (AMRUT) आणि MCED यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या अमृत सूर्यमित्र प्रशिक्षण कार्यक्रमाची तारीख जाहीर करण्यात आली असून हे प्रशिक्षण ६ जुलै २०२६ पासून सुरू होईल.

सूर्यमित्र प्रशिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू; प्रशिक्षण ६ जुलै २०२६ पासून  मुख्य फोटो
सूर्यमित्र प्रशिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू; प्रशिक्षण ६ जुलै २०२६ पासून  अतिरिक्त फोटो

लातूर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (AMRUT) व MCED यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या 'अमृत सूर्यमित्र' प्रशिक्षण कार्यक्रमाची तारीख जाहीर करण्यात आली असून, इच्छुक युवक-युवतींना प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


सौर ऊर्जा क्षेत्रात कुशल मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने आयोजित या प्रशिक्षणामध्ये सोलर पीव्ही प्रणालीची स्थापना, देखभाल, दुरुस्ती, सुरक्षा नियम, उद्योजकता विकास तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.


प्रशिक्षण दि. ६ जुलै पासून २४ जुलै पर्यंत आयोजित करण्यात आले असून, पात्र उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा. प्रवेश मर्यादित असल्याने 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर निवड करण्यात येणार आहे.


इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह खालील पत्त्यावर संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी : शुभम मुळजकर जिल्हा व्यवस्थापक लातूर संपर्क क्रमांक :७३९१०६५४७० पहिला मजला, पित्रछाया बिल्डिंग, मयुरेश्वर अपार्टमेंट, सिग्नल कॅम्प, विद्यानगर, लातूर, ता. लातूर, जि. लातूर – ४१३५१२.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: Shubham Mulajkar News publisher name | Date: 26-06-2026 News publication date | Time: 05:56 PM News publication time | Views: 190 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news
Publisher: Shubham Mulajkar News publisher name | Date: 26-06-2026 News publication date | Time: 05:56 PM News publication time | Views: 190 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement