सांगलीत ३० जूनपासून EDP उद्योजकता विकास प्रशिक्षण सुरु होणार आहे. लक्षित गटातील तरुणांना व्यावसायिक दृष्टिकोन देऊन त्यांना यशस्वी उद्योजक बनवणे, हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे.
सांगली: स्थानिक पातळीवर स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी आणि लक्षित गटातील घटकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी 'अमृत' (Academy of Maharashtra Research, Upliftment and Training) संस्थेच्या वतीने सांगलीमध्ये आगामी ३० जून २०२६ पासून विशेष उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे (EDP - Entrepreneurship Development Programme) आयोजन करण्यात आले आहे. लक्षित गटातील तरुणांना व्यावसायिक दृष्टिकोन देऊन त्यांना यशस्वी उद्योजक बनवणे, हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. प्रशिक्षणाची ठळक वैशिष्ट्ये :- या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमात नवउद्योजकांसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व तांत्रिक आणि व्यावहारिक बाजूंचा सखोल अभ्यास करून घेतला जाईल. व्यवसाय निवड व बाजारपेठ अभ्यास- स्वतःचा उद्योग सुरू करताना योग्य व्यवसायाची निवड कशी करावी आणि मार्केट सर्वे कसा करावा, याचे मार्गदर्शन. प्रकल्प अहवाल (Project Report) तयार करणे- बँकेकडून कर्ज मंजूर करून घेण्यासाठी आवश्यक असणारा अचूक बिझनेस प्लॅन आणि प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्याचे तंत्र. शासकीय योजना व आर्थिक सहाय्य- 'अमृत' संस्थेच्या योजनांसोबतच MSME नोंदणी, उद्योग आधार आणि विविध शासकीय अनुदान व कर्ज योजनांची सविस्तर माहिती. आधुनिक विपणन (Marketing) आणि ब्रँडिंग- डिजिटल मार्केटिंगच्या युगात आपल्या उत्पादनाची जाहिरात, पॅकेजिंग आणि विक्री कशी वाढवावी, याचे मार्गदर्शन. कायदेशीर बाबी व कर व्यवस्थापन- GST, व्यवसायासाठी लागणारे विविध परवाने (Licenses) आणि आर्थिक नियोजनाची माहिती. कोणासाठी आहे हे प्रशिक्षण? • 'अमृत' संस्थेच्या लक्षित गटातील सर्व पात्र तरुण-तरुणी. • स्वतःचा नवीन व्यवसाय किंवा उद्योग सुरू करण्याची इच्छा असणारे ग्रामीण व शहरी भागातील नवउद्योजक. • महिला उद्योजिका आणि पारंपरिक व्यवसायाला आधुनिकतेची जोड देऊ इच्छिणारे तरुण.
अमृत संस्थेच्या माध्यमातून लक्षित गटातील नागरिकांना रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या 'EDP' प्रशिक्षणाच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील तरुणांना केवळ नोकरी मागणारे नाही, तर नोकरी देणारे सक्षम उद्योजक बनवण्याचा अमृतचा उद्देश आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा नक्की लाभ घ्यावा,असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. अमृतच्या लक्षित गटात सद्यस्थितीमध्ये ब्राह्मण, सिंधी, हिंदू मारवाडी, गुजराती, पटेल, राजपूत, राजपुरोहित, हिंदू नेपाळी, बनिया, कम्मा, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, भूमिहार, येलमार, ठाकूर, त्यागी, सेनगूनथर, जाट, कानबी, कोमटी/वैश्य इत्यादि जाती आलेल्या आहेत. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/ अधिक माहितीसाठी संपर्क : अमृत - सांगली जिल्हा कार्यालय - 9112228766 महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), अप्पर तहसील कार्यालयासमोर, राजवाडा, सांगली
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment