देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण समाज मंडळाच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे अमृतला निमंत्रण

देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण समाज मंडळ, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने ५ जुलै रोजी इयत्ता १० वी व १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शैक्षणिक मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी अमृतच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा टीमला निमंत्रित करण्यात आले आहे.

देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण समाज मंडळाच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे  अमृतला निमंत्रण   मुख्य फोटो
देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण समाज मंडळाच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे  अमृतला निमंत्रण   अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर : देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण समाज मंडळ, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने रविवार, दि. ५ जुलै २०२६ रोजी इयत्ता १० वी व १२ वीमध्ये ८० टक्के व त्यापेक्षा अधिक गुण मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व पुढील शैक्षणिक मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या छत्रपती संभाजीनगर विभागीय जिल्हा कार्यालयाच्या जिल्हा टीमला विशेष निमंत्रण देण्यात आले आहे.

यासाठी देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण समाज मंडळाचे उपाध्यक्ष श्रीपाद निगुटे, कोषाध्यक्ष अंबादास कुलकर्णी आणि सचिव नरेश पटवर्धन यांनी अमृतच्या विभागीय जिल्हा कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी अमृत जिल्हा टीमच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

भेटीदरम्यान अमृत संस्थेमार्फत विद्यार्थी, युवक, महिला, शेतकरी आणि उद्योजकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, प्रशिक्षण कार्यक्रम व उपक्रमांची सविस्तर माहिती पदाधिकाऱ्यांना देण्यात आली. ही माहिती जाणून घेतल्यानंतर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अमृतच्या योजनांचा समाजातील विद्यार्थी, पालक व युवकांपर्यंत अधिकाधिक प्रचार व प्रसार करण्यासाठी आगामी काळात सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

तसेच, ५ जुलै रोजी होणाऱ्या गुणवंत विद्यार्थी सत्कार व शैक्षणिक मार्गदर्शन कार्यक्रमात अमृतच्या जिल्हा टीमने उपस्थित राहून विद्यार्थी व पालकांना विविध शासकीय योजना, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन करावे, अशी विनंतीही करण्यात आली. अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २४ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/ पत्ता : अमृत विभागीय व जिल्हा कार्यालय, पुंडलिक नगर रोड, सेक्टर -४ सिडको, पाण्याच्या टाकीजवळ, छत्रपती संभाजीनगर - ४३१००९

Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 26-06-2026 News publication date | Time: 03:36 PM News publication time | Views: 213 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 26-06-2026 News publication date | Time: 03:36 PM News publication time | Views: 213 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement