महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत “अमृत पेठ – थेट स्वदेशी बाजारपेठ” हा उपक्रम दिनांक २७ व २८ जून २०२६ दरम्यान गोरेगांव रायगड येथे आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र संशोधन, उन्नती प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थेचा ‘अमृत पेठ – थेट स्वदेशी बाजारपेठ’ उपक्रम रायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथे संपन्न होत आहे. रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी अमृतपेठ थेट बाजारपेठ, गोरेगाव येथे सहकुटुंब भेट देऊन नवउद्योजकांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
अमृत या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना यातून मोठी संधी उपलब्ध होणार आहे. या संस्थेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, लघुउद्योगांना चालना आणि स्वयंरोजगार निर्मिती याकरिता स्थानिक लघु उद्योजक व लक्षित गटातील विविध व्यावसायिक प्रशिक्षणे घेतलेल्या लाभार्थ्यांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी आणि विक्री कौशल्य वाढावे, याकरिता अमृत तर्फे ह्या उपक्रमाचे गोरेगाव येथे आयोजन करण्यात आले आहे.
संबोधि बौद्ध विहार, गोरेगाव (माणगाव) (जि. रायगड) येथे अमृत पेठ शनिवार दि. २७ जून ते रविवार दि. २८ जून रोजी होणार आहे. सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत बाजारपेठ खुली असणार आहे. लकी ड्रॉ कुपन काढून त्यातून विजेते निवडून त्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.
अधिक माहिती साठी संपर्क:-
रायगड जिल्हा व्यवस्थापक - शैलेश मराठे- ९११२२२८७५९
मंगेश ढेबे- ९४२३८९२१८२
सुयश मोने - ८१४९५५२१४३
सौ. अनुश्री वारे - ९५२७११०२६६
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment