अमृत तर्फे अहिल्यानगर येथे सोमवारी तहसील कार्यालयात - "अमृत संवाद सेतू उपक्रम "

अहिल्यानगर अमृत संस्थे मार्फत सोमवारी तहसील कार्यालय येथे होणार "अमृत संवाद सेतू उपक्रम ". निवडक विद्यार्थ्यांना मिळणार उपक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी.

अमृत तर्फे अहिल्यानगर येथे सोमवारी तहसील कार्यालयात - "अमृत संवाद सेतू उपक्रम " मुख्य फोटो
अमृत तर्फे अहिल्यानगर येथे सोमवारी तहसील कार्यालयात - "अमृत संवाद सेतू उपक्रम " अतिरिक्त फोटो

महाराष्ट्र शासनाच्या "अमृत" या स्वायत्त संस्थेअंतर्गत विद्यार्थ्यांना शासकीय कार्यालयांमधील कार्यपद्धती, रचना व प्रशासनाची माहिती व्हावी यासाठी "अमृत संवाद सेतू उपक्रम" संपूर्ण महाराष्ट्रभर राबविण्यात येणार आहे. या संबंधित पूर्वसूचना अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी तहसीलदार मा. श्री. स्वप्नील ढवळे यांना पत्र देऊन दिली आहे. तहसीलदार मा. श्री. स्वप्नील ढवळे साहेब यांनी दिनांक २९ जून रोजी सकाळी ११ वाजता सर्व विद्यार्थ्यांना कामकाजाबाबत मार्गदर्शन करणार असून सर्व कार्यालय विभागांना भेट देण्यासाठी मान्यता दिली आहे.

या उपक्रमामध्ये साधारणतः १५ विद्यार्थी एका गटात सहभागी होतील. विद्यार्थ्यांना खालील बाबींचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

- शासकीय कार्यालयांची ओळख

- संबंधित विभाग व अधिकारी कसे शोधायचे?

अधिकाऱ्यांशी संवाद कसा साधायचा? :-

- त्यांच्या जबाबदाऱ्या व कार्यक्षेत्र समजून घेणे.

- विविध विभागांच्या कार्यपद्धतीची माहिती

- तहसील कार्यालय, पंचायत समिती, कृषी विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन, सिंचन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) इत्यादी.

- वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जाण्याची प्रक्रिया.

- अर्ज, निवेदन, चिठ्ठी पाठवणे व पोहोच घेण्याची पद्धत

अर्ज व निवेदन लेखन :-

- आपला मुद्दा प्रभावीपणे कसा मांडावा?

- लेखी अर्ज व निवेदन कसे तयार करावे?

- अर्जामध्ये विषय, मुद्दे व अपेक्षित कार्यवाही कशी नमूद करावी?

पाठपुरावा (Follow-up) प्रक्रिया :-

- स्मरणपत्र देण्याची पद्धत.

- अर्जावर उत्तर न मिळाल्यास पुढील कार्यवाही.

- वरिष्ठ स्तरावर दाद मागण्याची प्रक्रिया.

- तक्रारींपेक्षा सुसंवादातून प्रश्न सोडविण्याचे महत्त्व.

प्रशासनातील मानवी बाजू समजून घेणे :-

- अधिकाऱ्यांवरील कामाचा ताण व जबाबदाऱ्या.

- त्यांच्या अडचणी व भावना समजून घेणे.

- सहकार्याची सकारात्मक भूमिका

शासनाकडे दाद मागण्याची प्रक्रिया :-

- पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री, आयुक्त, सचिव यांच्याकडे प्रतिनिधित्व.

- माहितीचा अधिकार अधिनियम (RTI).

- शासन निर्णय (GR), राजपत्र व शासनाच्या संकेतस्थळांचा वापर.

- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) यांची माहिती.

ऑनलाइन सेवा व सुविधा :-

- सेतू केंद्र, CSC केंद्र यांची माहिती.

- ऑनलाइन अर्ज प्रक्रिया.

- ७/१२ उतारा, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, EWS प्रमाणपत्र इत्यादी.

- ऑनलाइन पेमेंट पद्धती.

जबाबदार नागरिकत्व :-

- शासन हे आपलेच आहे, ही भावना रुजविणे.

- लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्याशी सकारात्मक संवाद.

- दोषारोपाऐवजी सामंजस्यातून प्रश्न सोडविण्याची भूमिका.

- या सर्व विषयांवर चर्चा व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

"आपण एक जबाबदार, सक्षम नागरिक आणि सक्रिय कार्यकर्ता होऊया!"

१८ वर्षांवरील विद्यार्थी/विद्यार्थिनी सहभागी होऊ शकतात.

इच्छुक विद्यार्थ्यांनी आपले नाव, पत्ता व शिक्षणाची माहिती खालील क्रमांकावर व्हॉट्सअँपद्वारे पाठवावी.

सोमवारी दिनांक २९ जून रोजी अहिल्यानगर तहसील कार्यालय येथे सकाळी ११ वाजता नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची कामकाजाची पाहणी होणार आहे.

सोमवारी (२९ जून) सकाळी ठीक ११ वाजता विद्यार्थ्यांनी अमृत कार्यालय येथे एकत्रित यावे.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी,जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार इत्यादी जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/ अमृत जिल्हा कार्यालय संपर्क क्रमांक :- 9112228769 जिल्हा कार्यालय पत्ता : वरुण अपार्टमेंट, आकाशवाणी केंद्र समोर,प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - 414003

Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 25-06-2026 News publication date | Time: 07:10 PM News publication time | Views: 111 Number of times this news has been viewed | District: Ahilyanagar Related district of the news
Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 25-06-2026 News publication date | Time: 07:10 PM News publication time | Views: 111 Number of times this news has been viewed | District: Ahilyanagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement